E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान
पिंपरी
: संघर्ष, साधना म्हणजे आशाताई भोसले, अशा महान व्यक्तींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील सा देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी भाषेतील गाणे ‘गणराज रंगी नाचतो’ हे रेकॉर्ड झाले तेंव्हा मी 13 वर्षाची होते. आशाताईंची गाणी ऐकून मला प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीची गायिका श्रेया घोषाल यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल यावर्षीचा हा 21 वा प्रतिष्ठित ‘आशा भोसले पुरस्कार 2026’ सुप्रसिद्ध पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला.यावेळी मराठी नाट्य परिषद शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अमित गोरखे, माजी महापौर योगेश बहल, मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उद्योजक कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. एक लाख 11 हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की,श्रेयाला मी लहानपणापासून बघतो आहे सर्वप्रथम षण्मुखानंद हॉलमध्ये माझेच गाणे गाताना मी तिला पाहिले. तेव्हाच तिला तू खूप छान गाते, असा आशीर्वाद दिला आहे. आ. अमित गोरखे यांनी सांगितले की, भाऊसाहेब भोईर हे या शहराचे सांस्कृतिक मंत्री आहेत. भोईर जर यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर, आज ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री झाले असते. स्वागत, प्रास्ताविक करताना भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की, या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, तर उच्छवास आशादीदी आणि याचे हृदय म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर आहेत.
लता मंगेशकर यांना देश सन्मानाने दीदी म्हणतो तसेच आता श्रेया घोषाल या आमच्या छोटी दीदी आहेत. त्यांनी या शहरात कार्यक्रम करण्यासाठी वेळ द्यावा असा आग्रह केला. याला श्रेया यांनी हात उंचावून होकार दर्शविला. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम झाला. यावेळी श्रेया घोषाल यांच्या हस्ते मानसी भोईर-घुले यांच्या मानसी रेस्कोर या बँडचे अनावरण करण्यात आले. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांच्या मैफलीचा रसिकांनी आनंद लुटला.
Related
Articles
सोन्याचे दर घसरले
01 Sep 2026
ग्रामीण भागातून तंत्रज्ञान विश्वात नवनाथ दरेकरांची गगनभरारी
31 Aug 2026
पंढरपूर कॉरिडॉरमधील बाधितांच्या जागा मिळणार
02 Sep 2026
आयात शुल्क... व्यापार युद्धाचे नवे शस्त्र
30 Aug 2026
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
31 Aug 2026
फेडररचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?