E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सीजेपीच्या आंदोलनामागील शक्ती ओळखा
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश
पुणे
: राहुल गांधी आणि विरोधकांकडून सातत्याने चुकीची माहिती पसरवली जात आहे. राजकारणातील लढाई केवळ विचारसरणीची राहिलेली नसून मुद्दे आणि नॅरेटिव्हची झाली आहे. सीजेपीसारख्या संघटनांच्या माध्यमातून कोणत्या शक्ती काम करत आहेत, हे कार्यकर्त्यांनी ओळखून त्याला प्रभावीपणे उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक काल गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित केली होती. यावेळी फडणवीस बोलत होते. या बैठकीस भाजपचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य तसेच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या आरोपांना केवळ राजकीय पातळीवर नव्हे, तर तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.
राहुल गांधी आणि विरोधकांकडून करण्यात येणार्या ‘राज्यघटना वाचवा’च्या भूमिकेवरही फडणवीस यांनी टीका केली. ज्यांनी आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांवर गदा आणली, तेच आज राज्यघटनेची भाषा करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. राज्यघटनेच्या नावाखाली राज्यघटनेच्या मूलभूत मूल्यांनाच धक्का देण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही त्यांनी केला. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसला लक्ष्य केले. 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देणार्यांनी नंतर त्याच मुद्द्यावर विरोधाची भूमिका का घेतली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
सीजेपीसारख्या संघटनांचा उल्लेख करताना फडणवीस यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. सीजेपी ही केवळ काही तरुणांची संघटना नसून, तिच्यामागे मोठे जाळे काम करत असल्याचे समजून घेतले पाहिजे, असा दावा त्यांनी केला. विरोधक किंवा विविध संघटनांकडून मांडल्या जाणार्या भूमिकेला भावनिक पद्धतीने नव्हे, तर तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमध्ये निर्माण होणार्या नॅरेटिव्हला वेळीच प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.दोन कोटी तरुणांपैकी दहा लाख युवा वॉरियर्समहाराष्ट्रातील 18 ते 26 वयोगटातील सुमारे दोन कोटी तरुणांपैकी किमान दहा लाख तरुण-तरुणींना भाजप युवा मोर्चाशी जोडण्याचे लक्ष्य असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
विकासकामांचा पाढा जनतेपर्यंत पोहोचवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आर्थिक आणि पायाभूत विकासाच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना स्टार्टअप, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, शेतकरी आणि रोजगारनिर्मितीच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह तयार केला तरी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकासकामांची आणि सरकारच्या योजनांची माहिती घेऊन जनतेपर्यंत पोहोचावे. जनतेसमोर तथ्य मांडल्यास सत्य समोर येईल. निंदकाचे घर शेजारी असू द्या; त्यामुळे आमचे काम अधिक चांगले होईल, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
Related
Articles
चेन्नईची जलक्रांती महाराष्ट्रातही व्हावी
06 Sep 2026
हसण्या-रूसण्यातही विठ्ठलभक्तीचा अनुभव
05 Sep 2026
बाळासाहेबांची पक्ष घटना उद्धव यांनीच बदलली
03 Sep 2026
भूममध्ये बेशिस्त वाहन चालकांविरुध्द पोलिसांची मोहीम
08 Sep 2026
पाऊस गायब, पिके करपली!
08 Sep 2026
चार पैकी एक जनधन खाते निष्क्रिय
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार