E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
डीजेच्या वादात पडू नका; गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करा
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
मुख्यमंत्र्यांचा पुणेकरांना सल्ला
पुणे
: ‘सध्या पुण्यात गणेशोत्सवातील डीजेवरून संघर्ष सुरू आहे. आपल्याला या वादात जायचे नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्पष्ट केले. तसेच पुण्याच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे डीजेवर थेट बंदीची घोषणा न करता पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक बाजू जपण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोप सत्रात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावर भाष्य केले. पुण्यात सध्या गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषण आणि डीजेच्या वापरावरून विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कोणतीही ठाम भूमिका मांडण्याऐवजी पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा दाखला देत पुणेकरांवर विश्वास व्यक्त केला.
पुण्यात गणेशोत्सव जवळ येत असताना डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कर्णकर्कश आवाजातील डीजेविरोधात नागरिकांनी आंदोलन केले आहे. दुसरीकडे, काही गणेश मंडळांकडून उत्सवावरील निर्बंधांबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून सुरू असलेल्या वादात मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट भूमिका घेण्याचे टाळत पुणेकरांना संयमाचा सल्ला दिला.
दरम्यान, डीजेच्या आवाजावरून पुण्यातील वादाला राजकीय रंगही चढला आहे. काही नागरिकांनी डीजे आणि अन्य कर्णकर्कश ध्वनिव्यवस्थेविरोधात आवाज उठविला आहे, तर गणेश मंडळांनी प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची भूमिका घेतली आहे. काही मंडळांनी यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णयही घेतला आहे.
‘पुण्याचा गणेशोत्सव ही मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा जपण्याची क्षमता केवळ पुणेकरांमध्ये आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. सांस्कृतिक पुण्याची ओळख संपूर्ण राज्यासह देश-विदेशात आहे. त्यामुळे पुणेकरच आपल्या कृतीतून सांस्कृतिक पुण्याची ओळख पुन्हा एकदा राज्यभर प्रस्थापित करतील.’
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Related
Articles
शासकीय बैठका, कार्यक्रम आणि कार्यालयातील उपहारगृहात आता आरोग्यदायी अन्नपदार्थ
02 Sep 2026
पाकिस्तानात १५ बंडखोर ठार
04 Sep 2026
हल्द्वानी ‘शुद्धीकरण’ प्रकरणी कारवाई नाहीच
04 Sep 2026
पीएमआरडीएच्या प्रारूप संरचना योजनेच्या कामाला गती
02 Sep 2026
कोयना पूर्ण क्षमतेने भरले
03 Sep 2026
संगीत प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेला वाव देते : शिरीष चिटणीस
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार