दिव्यांग विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर मात करावी : शामकांत शेंडगे   

बंडगार्डन : दिव्यांगत्व येणे हे आपल्या हातात नसते, परंतु त्या परिस्थितीवर मात करणे नक्कीच आपल्या हातामध्ये असते. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यंगाकडे न बघता पुढील आयुष्यात आणि भविष्यात काय करायचे आहे यावर अधिक जोर दिला, तर व्यंगामुळे कोणतीही अडचण येणार नाही, असा मोलाचा उपदेश येरवडा खुल्या कारागृहाचे अधीक्षक शामकांत शालन चंद्रकांत शेंडगे यांनी केला.लुंबिनी एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिव्यांग केंद्रात विद्यार्थ्यांसाठी ’श्रावण गोडवा पुरणपोळीचा’ उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना शेंडगे बोलत होते. 
 
दरम्यान,  केंद्रातील विद्यार्थ्यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे अत्यंत उत्साहात आणि सुमधुर आवाजात स्वागतगीत गाऊन स्वागत केले. लुंबिनी एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आणि ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मामा चव्हाण यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला. यावेळी  सोनू निकाळजे, सुजित यादव, शैलेंद्र चव्हाण, नितीन कांबळे, लक्ष्मी वाघमारे, उत्तमराव अडसूळ, सतीश जगताप  सुरेश जाधव, राजेश हरिभक्त, पप्पू गायकवाड, अजय अहिरे, शिवा सोनार, बाबा गवड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते.

Related Articles