E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विकसित महाराष्ट्रासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने क्रियाशील व्हावे
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे कार्यकारिणी बैठकीत आवाहन
पुणे
: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षकार्यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन क्रियाशील राहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सोमवारी झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने बैठकीच्या उद्घाटनाला सुरुवात झाली. भाजप पुणे जिल्हाध्यक्ष धीरज घाटे आणि त्यांच्या सहकार्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र उद्घाटनपर भाषणात चव्हाण म्हणाले, भाजपने राज्यभरातील कार्यकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना तसेच उपलब्धींची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या वक्त्यांची फळी तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील निवडणुकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे काम केल्यामुळे पक्षाला राज्यभरात मोठे यश मिळाले आहे.
‘28 हजार ग्रामपंचायतींपैकी 8 ते 10 हजार ठिकाणी भाजपचे सरपंच’
राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींपैकी 8 ते 10 हजार ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. राष्ट्रीयत्वाचा विचार घेऊन काम करणार्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी ताकद आणि क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, राज्यातील युवकांना नशेपासून मुक्त करण्यासाठी पक्षाने ठोस पाऊल उचलले पाहिजे. कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने यासाठी उपक्रम हाती घेतला, तर महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांचे हे कार्य कायमस्वरूपी लक्षात राहील, असेही चव्हाण यांनी सांगितले.
प्रत्येक बूथवर कार्यकर्ता, प्रत्येकाला जबाबदारी
राज्यातील 1 लाख 56 हजार बूथवर सक्षम कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे आवाहनही चव्हाण यांनी केले. प्रत्येक कार्यकर्त्यावर कोणती ना कोणती जबाबदारी सोपविण्यात यावी. आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद सदस्य, महापालिका सदस्य, ग्रामपंचायत सरपंच यांच्यापासून पक्षाच्या तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या सर्व कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Related
Articles
भारतीय नागरिकांमुळे विकास दराचा विक्रम
01 Sep 2026
साखरेचे घाऊक दर घसरले; शेवगावात मात्र किलोमागे ६५ रुपये
31 Aug 2026
धोम आणि तारळी धरण १०० टक्के भरले
01 Sep 2026
बाजारात पालेभाज्यांचा सुकाळ
30 Aug 2026
जनतेशी थेट नाळ जोडा
03 Sep 2026
श्रीमंती आणि विषमता
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?