E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
21 किलो गांजा जप्त
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
विधीसंघर्षित बालकासह आरोपी ताब्यात
पुणे
: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदा व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत शहर गुन्हे शाखा 6 च्या पथकाने मोठी कारवाई करीत तब्बल 21 किलो 180 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक विधिसंघर्षित बालक आणि त्याला गांजाचा पुरवठा करणार्या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 11 लाख 44 हजार 210 रुपये इतकी आहे.
पोपट मारूती पाडुळे (वय-56, रा. नविन म्हाडा कॉलनी बिल्डिंग, सुरक्षानगर) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. याच्या सह एका विधीसंघर्षित बालकावर वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा 6 च्या पथकाकडून बेकायदा व्यवसायांवर विशेष कारवाई केली जात आहे. त्यानुसार, 30 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष कदम, पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव, सहाय्यक पोलिस फौजदार ज्ञानेश्वर शिर्के यांच्यासह पथक परिसरात गस्त घालत होते.
दरम्यान, महिला पोलिस हवालदार पल्लवी मोरे आणि पोलिस अंमलदार बाळासाहेब सकटे यांना आरोपी दोघेही नवीन म्हाडा कॉलनी परिसरात गांजासह येणार असल्याची माहिती मिळाली. त्याधारे, खातरजमा करून पथकाने तातडीने परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्या ताब्यातून 21 किलो 180 ग्रॅम गांजासह इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात गांजाचा पुरवठा करणारे तसेच गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा पोलिस शोध घेत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Related
Articles
साखरेचे घाऊक दर घसरले; शेवगावात मात्र किलोमागे ६५ रुपये
31 Aug 2026
जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला, बेरोजगारांचे प्रश्नही ऐरणीवर
01 Sep 2026
आशियाई खेळांसाठी भारतीय खेळाडूंचा ‘स्मार्ट ट्रॅक’वर जोरदार सराव
02 Sep 2026
जयपूरमधील जीर्ण शाळा पाडली
03 Sep 2026
मनाचे हे खेळ सारे...
03 Sep 2026
जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात सर्वपक्षीय सदस्यांचे आंदोलन
01 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?