E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
हार्दिक पांड्या, नितीश तंदुरुस्त; सुंदरच्या पुनरागमनाची शक्यता
नवी दिल्ली
: अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि नितीश कुमार रेड्डी पूर्णपणे तंदुरुस्त झाले असून, वॉशिंग्टन सुंदरही पुनरागमनाच्या तयारीत आहे. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या सहभागाबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका 13 सप्टेंबरपासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे.
मालिकेतील तिन्ही सामने अरुण जेटली स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. नितीश कुमार रेड्डीने बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सरावाला वेग दिला आहे. तो पूर्ण क्षमतेने सराव करत असल्याचे वृत्त आहे. हार्दिक पांड्यानेही तेथे तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या अष्टपैलू पर्यायांना मोठे बळ मिळणार आहे. दरम्यान, डावखुरा फिरकीपटू कृणाल पांड्याच्या नावाचाही टी-20 संघासाठी विचार होण्याची शक्यता आहे. आयपीएल 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना त्याने 14 बळी घेत प्रभावी कामगिरी केली होती.
सुंदर पुनरागमनाच्या मार्गावर
वॉशिंग्टन सुंदर या आठवड्यात सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये परतणार असून, तेथे त्याची फिटनेस चाचणी होणार आहे. दरम्यान, भारतीय निवड समितीची याच आठवड्यात बैठक होणार असून, अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानचीही तयारी पूर्ण
अफगाणिस्तानने मालिकेसाठी आपला संघ यापूर्वीच जाहीर केला आहे. इब्राहिम झद्रानकडे पूर्णवेळ टी-20 कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. खांद्याच्या दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकचेही संघात पुनरागमन झाले आहे.
बुमराच्या फिटनेसवर लक्ष
गुडघ्याच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमरा श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांना मुकला होता. सध्या बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये त्याचे पुनर्वसन सुरू असून, त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे वृत्त आहे. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला खेळविण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. बुमराहचे पुनरागमन घाईने न करता टप्प्याटप्प्याने करण्याचा संघ व्यवस्थापनाचा विचार आहे.
Related
Articles
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी अनीश सहस्रबुद्धे पंच
31 Aug 2026
परदेशी निधीचा आरोप फेटाळला
04 Sep 2026
पूरग्रस्त भागात पावसाचा इशारा
30 Aug 2026
गदर पार्टीचे राजदूत - डॉ. मथुरा सिंह
04 Sep 2026
जितेंद्र मिश्रा अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी
02 Sep 2026
ज्या हिंदूला भारतात मुस्लिमांना स्थान नाही असे वाटते, तो हिंदू नाही
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?