E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सूर्यवंशीची 92 धावांची झंझावाती खेळी
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
दुलीप ट्रॉफी
बेंगळुरू
: युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 92 धावांची आक्रमक खेळी करत लाल चेंडूच्या क्रिकेटमधील आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली. मात्र, दुलीप ट्रॉफी उपांत्य फेरीच्या दुसर्या दिवशी पूर्व विभागाला मध्य विभागावर पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने 66 धावांत 4, तर वेगवान गोलंदाज यश ठाकूरने 66 धावांत 3 आणि आर्यन पांडेने 43 धावांत 3 बळी घेत पूर्व विभागाचा डाव 266 धावांत संपविला. मध्य विभागानेही पहिल्या डावात 266 धावा केल्याने दोन्ही संघांची पहिल्या डावातील धावसंख्या समान राहिली.
15 वर्षांच्या सूर्यवंशीने दुलीप ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज होण्याचा विक्रम केला. त्याने 1969 मध्ये 16 व्या वर्षी हा पराक्रम करणार्या लक्ष्मण सिंहचा विक्रम मोडला. सूर्यवंशीने 81 चेंडूंत 92 धावांची खेळी करताना अनेक आकर्षक फटके खेळले. हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो 92 धावांवर बाद झाला आणि शतकाची संधी हुकली. त्याने अभिमन्यू ईश्वरनसोबत पहिल्या विकेटसाठी 161 धावांची भक्कम भागीदारी केली. ईश्वरनने 69 धावा केल्या. सूर्यवंशी बाद झाल्यानंतर पूर्व विभागाची फलंदाजी कोलमडली. पूर्व विभागाने अखेर केवळ 105 धावांत सर्व 10 विकेट गमावत 266 धावांवर डाव संपविला.
तिलकच्या शतकाने दक्षिण विभागाला आघाडी
कर्णधार तिलक वर्माने कठीण खेळपट्टीवर संयमी आणि झुंजार शतक झळकावत दक्षिण विभागाला दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. उत्तर विभागाविरुद्धच्या सामन्यात दक्षिण विभागाने दुसर्या दिवसअखेर 9 बाद 285 धावा केल्या असून, पहिल्या डावात त्यांना 90 धावांची आघाडी मिळाली आहे.तिलकने 219 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. दिवसअखेर तो 106 धावांवर नाबाद होता. दक्षिण विभागाचे अवघ्या 80 धावांत पाच फलंदाज माघारी परतले होते. श्रेयस गोपालने 88 धावांची संयमी खेळी करत तिलकसोबत 175 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याआधी उत्तर विभागाचा पहिला डाव 195 धावांत संपुष्टात आला.
Related
Articles
वायसीएम रुग्णालयात एफडीएचा छापा
02 Sep 2026
थेरगाव 16 नंबर ते बारणे कॉर्नर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
01 Sep 2026
पाबळ-खैरेनगर-धामारी ’एमआयडीसी’ला तात्काळ स्थगिती
03 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
नानगावमध्ये विहिरीत आढळला चिमुकलीचा मृतदेह
03 Sep 2026
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कर्मचार्यांची दादागिरी
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?