E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारताची विजयी सलामी
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
थायलंडवर 94 धावांनी दणदणीत मात
महिला आशिया कप
दुबई
: भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया कपमध्ये विजयी सुरुवात करत थायलंडचा 94 धावांनी दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 9 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात थायलंडचा डाव 16.1 षटकांत अवघ्या 65 धावांत आटोपला.भारताच्या विजयात शेफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीची, तर नंदिनी शर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या प्रभावी गोलंदाजीची महत्त्वाची भूमिका ठरली. दीप्तीने एकही धाव न देता तीन विकेट्स घेतल्या. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. नानापट कोंचारोएनकाई हिने सर्वाधिक 41 धावा केल्या. तिच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फलंदाजाला सहा धावांपेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. दीप्ती आणि नंदिनी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, तर श्री चरणीने दोन आणि क्रांती गौडने एक विकेट मिळविली.
शेफालीचे दमदार अर्धशतक
मंधाना बाद झाल्यानंतर शेफालीने आक्रमक फलंदाजी करत भारताची धावगती कायम ठेवली. भारताने पॉवरप्लेमध्ये 1 बाद 65 धावा करत महिला टी-20 आशिया कपमधील पॉवरप्लेतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम नोंदविला. शेफालीने 26 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. तिने 36 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि तीन षटकारांसह 64 धावांची खेळी केली.अखेरच्या टप्प्यात भारतीय फलंदाजी डळमळली. 13 व्या शतकात आलोमीने शेफाली आणिा पुढच्याच चेंडूवर रिचा घोषला बाद केले. कर्णधार हरमनप्रीत कौर पाच धावांवर बाद झाली. भारताने 137 धावांवर 9 विकेटस गमावल्या होत्या. मात्र, अखेरीस श्री चरणी आणिा क्रांती गौड यांनी 22 धावांची भागीदारी करत भारताला 159 धावांपर्यंत पोहोचविले. थायलंडकडून लाओमीने 3 तर सुनीदा हिने 2 विकेटस घेतल्या.
मंधानाने सूझी बेट्सला मागे टाकले
थायलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्मृती मंधाना 10 चेंडूंमध्ये चार चौकारांसह 19 धावा करून धावबाद झाली. मात्र, तिने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत सूझी बेट्सला मागे टाकत दुसरे स्थान मिळविले. मिताली राज 10,868 धावांसह अव्वल आहे.
Related
Articles
कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार
04 Sep 2026
आशियाई खेळांसाठी भारतीय खेळाडूंचा ‘स्मार्ट ट्रॅक’वर जोरदार सराव
02 Sep 2026
बाळासाहेबांची पक्ष घटना उद्धव यांनीच बदलली
03 Sep 2026
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका
02 Sep 2026
प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; मारहाण अयोग्य : मुख्यमंत्री
04 Sep 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता बाबींचा आयुक्तांकडून आढावा
01 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?