जर्मनी चौथ्यांदा विश्‍वविजेते   

वावरे : जर्मनीने एफआयएच पुरुष हॉकी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा 1-0 असा पराभव करून सलग दुसर्‍यांदा आणि एकूण चौथ्यांदा विश्वविजेतेपद पटकावले. यासह जर्मनीने पाकिस्तानच्या सर्वाधिक चार पुरुष विश्वचषक विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली.जर्मनीने यापूर्वी 2002, 2006 आणि 2023 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 2002 आणि 2006 मध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून, तर 2023 मध्ये बेल्जियमवर मात करत त्यांनी किताब पटकावला होता. स्पेन आणि जर्मनी यांच्यातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, 44व्या मिनिटाला मायकेल स्ट्रुथऑफने मैदानी गोल करत जर्मनीला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनला अखेरपर्यंत बरोबरी साधता आली नाही आणि स्ट्रुथऑफचा हा एकमेव गोल निर्णायक ठरला. स्पेन तिसर्‍यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र पुन्हा एकदा त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

Related Articles