E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
वाचक लिहितात
Wrutuja pandharpure
01 Sep 2026
डिजिटल व्यवहार पुन्हा रोखीकडे?
यूपीआय व्यवहारांचा वाढता खर्च पाहता मोठ्या रकमेच्या व्यापारी व्यवहारांवर’ टप्याटप्याने शुल्क म्हणजेच मर्चंट डिस्काउंट रेट’ (एमडीआर) लावण्याची शिफारस संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीने केली आहे. यूपीआय व्यवहारांवर प्रक्रिय करण्यासाठी वित्तीय संस्थांचा अंदाजे 20,700 कोटी रुपयांचा खर्च होतो. मात्र, सरकारने ’शून्य एमडीआर’ मुळे होणार्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी केवळ 2000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. म्हणजेच प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत सरकारची मदत 10 टक्के आहे आणि ती कायम राहिल्यास यूपीआयच्या यंत्रणेवरील आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. असे सरकारचे म्हणणे आहे. छोटे दुकानदार, लहान व्यापार्यांना जरी यामधून सुट असली.तरी,मोठे व्यापारी आणि मोठे व्यवहार यांच्या व्यवहारांवर संभावित शुल्क आकारण्यात येणार आहे. किती मोठे व्यवहार? आणि कशाप्रकारचे व्यवहार? हे अजून जरी स्पष्ट झाले नसले तरी,त्याचा परिणाम स्वरूप हे आकारलेले शुल्क सरते शेवटी व्यापारी सामान्य ग्राहकांकडून वसूल करणार नव्हे काय? हाताच्या बोटांवर मोबाईलद्वारे नियंत्रित असलेले सामन्यांचे व्यवहार आता पुन्हा रोख रक्कम पाकिटात ठेऊन करावे लागणार. तेव्हा आता या पुढे शुल्क टाळायचे असेल तर रोख रक्कम जवळ ठेवण्याची जोखीम घ्यावी लागणार.
दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई
हा तर रक्तदानाचा बाजार
रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रँट रोड येथे झालेल्या रक्तदान शिबिरात रक्तदानकर्त्यांना तीन ते चार हजारांचे महागडे घड्याळ देण्यात आले, हे चुकीचेच आहे. काहीतरी भेटवस्तू मिळते आहे, म्हटल्यावर रक्तदाते गर्दी करणारच. आपल्याकडे असे अनेक रक्तदाते आहेत, की ते अनेक वेळा रक्तदान करतात. ते सुद्धा कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता त्यांचे खरोखरच कौतुक आहे व रक्तदानामुळे अनेक व्यक्तींचा प्राण वाचतो, याचे समाधान मिळते ते वेगळेच. निवडणुका जवळ आल्या की, काही मतदार संघामध्ये आपला उमेदवार निवडून यावा यासाठी पक्षाचे कार्यकर्ते, मिक्सर किंवा आणखी काहीतरी भेटवस्तू देतात. अशा रीतीने मतदारांना विकत घेणे हे चुकीचेच आहे. ज्या कोणी रक्तदात्यांना घड्याळे भेटवस्तू म्हणून दिल्या असतील, त्यांचावर कारवाई झालीच पाहिजे व भेटवस्तू देऊन त्याच्या मोबदल्यात रक्तदानासारख्या पवित्र दानाचा बाजार मांडणे योग्य नव्हे.
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई
कृत्रिम बुद्धीमत्तेची ताकद
कृत्रिम बुद्धिमत्ता ही उच्चशिक्षण क्षेत्रासमोरील सर्वात मोठ्या परिवर्तनकारी शक्तीपैकी एक आहे विद्यापीठांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा की नाही, हा प्रश्न आता राहिलेला नाही प्रश्न हा आहे एआयचा वापर जबाबदारीने आणि नैतिकतेने कसा करायचा ? एआय अध्यापन, मूल्यमापन, संशोधन, प्रशासन, आणि विद्यार्थी सेवा यामध्ये अमुलाग्र बदल घडवू शकते त्याचवेळी शैक्षणिक प्रामाणिकता, डेटा गोपनीयता, बौद्धिक संपदा आणि शिक्षकांच्या बदलत्या भूमिकेसारखे प्रश्नही निर्माण होतात म्हणून भविष्यातील विद्यापीठ हे एआय एनेबेल्ड पण ह्युमन सेंटर्ड असले पाहिजे. तंत्रज्ञानाने शिक्षकांची भूमिका संपवू नये उलट ती अधिक प्रभावी करावी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात चिकित्सक विचार, नैतिक निर्णयक्षमता, सर्जनशीलता, सहानुभूती, आणि मानवी विवेकाचे महत्त्व अधिक वाढणार आहे.
राजू जाधव, मांगूर जि. बेळगांव
कर्जात बुडालेली राज्ये
देशातील 28 राज्यांची कर्जाची आकडेवारी नुकतीच वाचावयास मिळाली. त्यानुसार राज्यावर तब्बल 110 लाख कोटीचे कर्ज असल्याचे कळते. केंद्र सरकारने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या कर्जाचा वापर उत्पादक मालमत्ता उभारण्ययाऐवजी त्याचा उपयोग नियमित महसुली खर्चासाठी होत असल्याचे दिसून आल आहे. उपभोगावरील खर्च तसेच कल्याणकारी योजनांवर हा खर्च होत आहे असेही आढळून आले आहे. देशात सर्वात जास्त कर्ज तामिळनाडू राज्याचे आहे. महाराष्ट्रावर 9.37 लाख कोटीचे कर्ज आहे. निवडणूक होत असताना मते मिळविण्यासाठी फुकट वस्तू व सेवा यांचा मारा मतदारावर केला जातो तेच कारण कर्ज वाढण्याचे आहे. यासंबंधी राज्यावर काही बंधने घालणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक राज्ये कर्ज बाजरी होतील. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न मात्र 3.47 लाख एवढे आहे. यावर काही निर्बंध असणे जरुरीचे आहे असे वाटते.
शांताराम वाघ, पुणे
भाविकांना शिस्तीची गरज
बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात दर्शनासाठी अलोट गर्दी उसळली. भीषण चेंगराचेंगरीत 7 महिला भाविकांना आपला जीव गमवावा लागला. मंदिरांच्या ठिकाणी चेंगराचेंगरीच्या अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना यापूर्वी देशात अनेकवेळा घडल्या आहेत. आपल्या देशात धार्मिक उत्सव आणि यात्रांना खूप मोठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा आहे. मात्र दुर्दैवाने अलीकडच्या काळात या पवित्र तीर्थक्षेत्रांना चेंगराचेंगरीच्या दुर्घटनांचे ग्रहण लागले आहे. मंदिराचा मर्यादित परिसर एकाचवेळी अफाट गर्दीला सामावून घेऊ शकत नाही. त्यातच मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक प्रशासन यांच्यात अनेकदा योग्य समन्वयाचा अभाव असतो. अचानक पसरणार्या खोट्या अफवांमुळे भाविकांमध्ये भीती निर्माण होते. अशा संकटाच्या वेळी बाहेर पडण्यासाठी पुरेसे मार्गही नसतात. परिणामी चेंगराचेंगरी होऊन भाविकांचा नाहक बळी जातो. धार्मिक स्थळांचे पावित्र्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच भाविकांचे जीवही महत्त्वाचे आहेत. सरकारने अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत म्हणून ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. भाविक म्हणून अशा ठिकाणी आपणही शिस्त पाळणे गरजेचे आहे.
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई
Related
Articles
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
01 Sep 2026
राम मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जितेंद्र मिश्रा
03 Sep 2026
बिकानेरमधील अपघातात बालकासह तिघांचा मृत्यू
30 Aug 2026
पैठणीवर आता बारकोड
01 Sep 2026
सिडको प्रशासनाचा ढिसाळ कारभार
04 Sep 2026
काळ्या समुद्रातील संघर्षाचा धान्य व्यापाराला फटका
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?