तोतया न्यायाधीशाला आठ वर्षांची शिक्षा   

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असल्याचे सांगून अनेकांना फसविणार्‍यास एकाला आठ वर्षांची शिक्षा दिल्ली न्यायालयाने सोमवारी ठोठावली. सुकेश चंद्रशेखर, असे तोतयाचे नाव आहे  त्याने न्यायाधीश असल्याचे सांगून खटल्याचे कामकाज करुन जामीनही दिला होता. 
 
या प्रकरणी तीस हजारी न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी हर्षिता मिश्रां यांनी चद्रशेखर याला दोन वर्षांच्या सश्रम कारवासाची आणि पाच हजारांचा दंड, दोन वर्षौंची तुरुंगवासाची आणि पाच हजारांचा दंड आणि चार वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा अनुक्रमे कलम १७०, १८९ आणि ६०७ अंतर्गत  ठोठावली आहे.  या संदर्भातील आदेश २९ ऑगस्ट रोजी दिला होता. त्याची प्रत काल उपलब्ध झाली. न्यायालयाने सांगितले की, शिक्षा अशा प्रकारे असावी की, त्यातून फौजदारी न्यायव्यवस्था ही ’एखाद्या वेगळ्या बेकायदा कृती’मध्ये आणि ’सार्वजनिक संस्थांच्या कायदेशीर कामकाजात फेरफार करण्यासाठी, त्यांना धमकावण्यासाठी किंवा त्यात अडथळा आणण्यासाठी मुद्दामहून केलेल्या कृतींच्या मालिकेत’ फरक करते, हे स्पष्ट व्हावे. 
 
न्यायालयाने आदेश दिला की, तिन्ही मुख्य शिक्षा एकापाठोपाठ एक (सलग) भोगाव्या लागतील, ज्यामुळे एकूण कारावासाचा कालावधी आठ वर्षे होईल. दंड भरण्यात कसूर केल्यास, चंद्रशेखरला अतिरिक्त एक महिन्याचा कारावास भोगावा लागेल.
 
शिक्षा सुनावणार्‍या आदेशानुसार, २८ एप्रिल २०१७ रोजी चंद्रशेखरने दक्षिण भारतातील सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश असल्याचे भासवून न्यायिक अधिकारी पूनम चौधरी यांना  फोन केले; तसेच खरोखरच न्यायाधीश असल्याचे भासवले होते. न्यायालयाने नमूद केले की, दुसर्‍या एका फौजदारी खटल्यात चंद्रशेखरच्या स्वातंत्र्याशी संबंधित असलेल्या न्यायालयीन कार्यवाहीवर प्रभाव टाकणे हा यामागील उद्देश होता; तसेच न्यायालयाने त्याच्या या वर्तनाचे वर्णन न्यायालयीन प्रक्रियेची पावित्र्यता आणि सचोटी यांवरील हल्ला असे केले.
 

Related Articles