बांगला देशही मक्का करारात ?   

ढाका : सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तान यांनी मक्का संरक्षण करार केला आहे. त्या करारात सहभागी होण्यात कोणताच धोका नसल्याचे बांगला देशाचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री हुमायू कबीर यांनी सोमवारी स्पष्ट केले. 
 
मक्का संयुक्त संरक्षण करार या करारावर  ७ ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, तुर्किये आणि पाकिस्तान यांनी स्वाक्षरी केली होती. त्याअंतर्गत एखाद्या देशावर हल्ला झाला तर तो तिन्ही देशांवर झाला असे मानले जाईल, असे ठरले आहे. एकंदरीत नाटो देशांच्या संघटनेच्या धर्तीवर मुस्लिम धर्मीय तीन देशांनी संरक्षण विषयक करार केला आहे. त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा बांगला देशाने केली असून त्यामध्ये कोणताही धोका वाटत नाही, अशी भूमिका कबीर यांनी घेतली असल्याचे मानले जाते. 
 
दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री खलीलुर रहमान यांनी संसदेत सांगितले होते की, मक्का संरक्षण करारात बांगला देशाला सामील करुन घेण्याबाबात सकारात्मक आहोत करारात सामील होण्याबाबतचे निमंत्रण मिळाले तर नक्कीच विचार केला जाईल. मुस्लिम धर्मीय देश एका कुटुंबाप्र्रमाणे आहेत. त्यात अन्य कोणी नाक खूपसण्याची किंवा त्याबाबत अधिक चिंता करण्याची काही एक गरज नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. करारात सहभागी होण्याची अपूर्व अशी संधी देशाला मिळात आहे, असे कबीर यांनी सौदी अरेबियाचे राजदूत अब्दुल्ला झाफेर बीन अबिय्याह यांच्याशी चर्चा केल्यानंतर सांगितले.  याबाबत सहकारी तीन देशांसोबत आम्ही सकारात्मक चर्चा करत आहोत, असेही ते म्हणाले. 
 

Related Articles