शेअर बाजार घसरला   

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे खनिज तेलाच्या किमती पुन्ह वाढल्या आहेत. व्याजदर वाढीची शक्यता निर्माण झाली त्यामुळे युटिलिटीज, आयटी (आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांची सोमवारी विक्री झाली. पर्यायाने शेअर बाजार घसरुन बंद झाला.
 
सेन्सेक्स ३०७.२४ ने किंवा ०.४० टक्क्यांनी  घसरून ७६ हजार ९५७.२७ वर बंद झाला. २० कंपन्यांचे समभाग घसरले, तर दहा  कंपन्यांचे समभागांचे मूल्य वाढले. दिवसभरात सेन्सेक्स ५१३.१९ ने किंवा ०.६६ टक्क्यांनी घसरून ७६ हजार ७५१.३२ पर्यत खाली आला होता. निफ्टी ९५.२५ ने किंवा  ०.३९ टक्क्यांनी घसरून २४ हजार ८०.४० वर बंद झाला. 
 
आयटी, भारती एअरटेल, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, ट्रेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टायटन या कंपन्यांचे समभागांचे मूल्य घसरले. या उलट . 
सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या समभागांचे मूल्य वाढले. ’ब्रेंट क्रूड’च्या दरात ३.६३ टक्क्यांनी वाढ होऊन प्रति पिंपाचा ९१.३०  डॉलर्सवर पोहोचला. 
 
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राजकीय तोडगा निघण्याची शक्यता कमी झाली. पयोंयाने खनिज तेलाचे दर आणि आणि जागतिक ’रोख्यांवरील परतावा वाढला आहे.   त्यामुळे ऊर्जा-आधारित महागाई आणि व्याजदर वाढीबाबत पुन्हा चिंता निर्माण झाली आहे, ज्याचा परिणाम कंपन्यांच्या कमाईवर  होऊ शकतो. 
 
- विनोद नायर, प्रमुख संशोधक, जिओजित 
 
जागतिक रोख्यांवरील परतावाअनेक वर्षांतील उच्चांकावर पोहोचला आणि फेडरल रिझर्व्हला  धोरण दीर्घकाळासाठी कडक ठेवावे लागेल, अशी भीती निर्माण झाली; या सर्व घटकांमुळे ’निफ्टी’ने महिन्यातील नीचांकी पातळी गाठली,
 
 - पोनमुडी आर. मुख्य कार्यकारी अधिकारी, ’एनरिच मनी’
 

Related Articles