E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
खर्या शत्रूला ओळखा
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचे इस्लामी देशांना पत्र
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी मुस्लिम देशांना, विशेषतः आखाती देशांना, त्यांच्या खर्या शत्रू विरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, मुस्लिमांमधील फुटीमुळे शत्रूंना फायदा होत आहे. त्यामुळे खर्या शत्रूला ओळखा, हा संदेश खामेनी यांच्या समाज माध्यमाद्वारे पैगंबर महंमद यांच्या जन्मदिनानिमित्त साजर्या होणार्या इस्लामिक ऐक्य सप्ताहानिमित्त दिला आहे.
खामेनी यांच्या विधानात मुस्लिम ऐक्य, विविध क्षेत्रांतील सहकार्य आणि परस्पर सुरक्षेचे आवाहन करण्यात आले आहे. ते म्हणाले की, जो कोणी मुस्लिमांमध्ये फूट पाडतो-मग ती जाणूनबुजून असो वा नकळत-तो इस्लामच्या शत्रूंना मदत करतो. मुस्लिम एकजूट झाले तर पॅलेस्टिनी इतके असहाय्य राहतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खामेनी यांनी विशेषतः आखाती देशांच्या अरब शासकांना विचारले की, जर आखाती देशांतील जनता आणि सरकारे इस्लामच्या झेंड्याखाली एकजूट झाली, तर अज्ञात गुंड त्यांची जमीन आणि मालमत्ता बळकावण्याचे धाडस करतील का? इस्लामिक देशांच्या शासकांना, विशेषतः पश्चिम आशिया आणि आखाती देशांतील शासकांना माझा ठाम आणि वारंवार सल्ला आहे की, त्यांनी आपला खरा शत्रू ओळखावा, त्याच्या योजना समजून घ्याव्यात आणि त्याचा सामना करावा, असे खामेनी मोजतबा यांनी नमूद केले.
Related
Articles
सोन्याचे दर घसरले
01 Sep 2026
विकास दर ७.८ टक्के
31 Aug 2026
मणिपूर विधानसभेत प्रथमच कुकी आमदारांचा प्रवेश
02 Sep 2026
पुरवठा विभागाचा साठेबाजांना इशारा, १० टनांपेक्षा जास्त साखर आढळल्यास कारवाई
31 Aug 2026
मेस्सीच्या निवृत्तीने चाहते भावूक; आठवणींचा प्रवास पुन्हा चर्चेत
02 Sep 2026
मोबाइल उत्पादनासाठी 62 हजार कोटींची योजना
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?