E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
जलविद्युत प्रकल्पांमधील ५०० हून अधिक बेपत्ता
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
बोगद्यांमध्ये अडकलेल्यांना काढण्यासाठी बचावकार्याला गती
काठमांडू : नेपाळच्या पूरग्रस्त रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांमधील नऊ जलविद्युत प्रकल्पांमधील ५३७ कर्मचारी आणि कामगार अद्याप बेपत्ता आहेत. ढिगारे आणि चिखलाने बंद झालेल्या बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती असलेल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे.बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर साचलेला चिखल आणि ढिगारा, खराब झालेली पायाभूत सुविधा, दुर्गम भूभाग आणि खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळा येत आहे. परिणामी, नेपाळने भारत, चीन आणि इतर देशांकडून विशेष तांत्रिक मदतीची मागणी केली आहे.
ऐतिहासिक पुस्तके आणि दस्तऐवजांचा शोध
इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ नेपाळ (आयपीपीएएन) नुसार, २६ ऑगस्ट रोजी आलेल्या पुरानंतर या दोन जिल्ह्यांमधील नऊ जलविद्युत प्रकल्पांमध्ये काम करणारे ८९८ कर्मचारी आणि कामगार संपर्क होत नसल्याचे प्राथमिक अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३६१ जणांना वाचवण्यात आले आहे, तर ५३७ जण अजूनही बेपत्ता आहेत.
रसुवा येथील २१६-मेगावॅटच्या अप्पर त्रिशुली-१ जलविद्युत प्रकल्पात सर्वात गंभीर परिस्थिती आहे. प्रकल्पाच्या बोगद्यात सुमारे ३०० लोक अडकल्याची भीती आहे. नुवाकोट येथील ६०-मेगावॅटच्या अप्पर त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पात बोगद्याचे प्रवेशद्वार चिखल आणि ढिगार्याने बंद झाल्यानंतर बचावकार्यात काही प्रमाणात प्रगती झाली आहे.
नेपाळी लष्कराने पूरग्रस्त प्रकल्प स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी नुवाकोटमधील बटोर येथे विमानाने उत्खनन यंत्रे आणि बुलडोझर्स पाठवले आहेत. संयुक्त बचाव पथके अहोरात्र काम करत आहेत आणि बोगद्याच्या प्रवेशद्वारावरील बचावकार्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याची त्यांना आशा आहे.
Related
Articles
सेबीचे सीएएस की तकेशीचा कॅसल?
31 Aug 2026
कोयना पूर्ण क्षमतेने भरले
03 Sep 2026
ग्रामीण भागातून तंत्रज्ञान विश्वात नवनाथ दरेकरांची गगनभरारी
31 Aug 2026
बाजारात पालेभाज्यांचा सुकाळ
30 Aug 2026
बिकानेरमधील अपघातात बालकासह तिघांचा मृत्यू
30 Aug 2026
साखर, गुळाचा गोडवा वाढला
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?