E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सरकार स्वतःच गैरव्यवहारामध्ये अडकले
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर
नवी दिल्ली : केंद्र सरकार स्वतःच गैरव्यवहारामध्ये अडकले आहे. पेपरफुटीसाठी केवळ परीक्षा पद्धतीच्या अपयशाला जबाबदार धरण्याऐवजी, त्याचा संबंध समाजातील आणि प्रशासनातील वाढत्या भ्रष्टाचाराशी आहे. जेव्हा विद्यार्थ्यांना दिसते की, शिक्षकांच्या नेमणुका लाच देऊन होत आहेत आणि प्रत्येक क्षेत्रात पैशाचा सुळसुळाट आहे, तेव्हा तेसुद्धा चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, असे टीका भारतीय जनता पक्षाचे संस्थापक, आणि मार्गदर्शक मंडळाचे सदस्य डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी मोदी सरकार केली आहे.
एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. जोशी यांनी पेपरफुटी, शिक्षणाचे व्यापारीकरण, अर्थसंकल्पीय कपात आणि सरकारच्या ’विकसित भारता’च्या संकल्पनेवर टीका केली.
डॉ. जोशी म्हणाले, वाजपेयीजींच्या काळात पेपरफुटी का झाली नाही? ते आज बँका आणि व्यवसायांमध्ये गैरव्यवहार होत आहेत आणि सरकार स्वतः घोटाळ्यांमध्ये अडकले आहे, ज्याचा परिणाम शिक्षण आणि विद्यार्थ्यांवरही होत आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारकडून विमाने, सैन्य आणि सुरक्षा यंत्रणांच्या वापर केला जात आहे. ही परीक्षा नसून युद्धासारखी परिस्थिती वाटते. प्राथमिक शिक्षण आणि आरोग्यासाठीचे बजेट सातत्याने कमी होत आहे, तर रस्ते आणि रस्ते वाहतुकीवरील खर्च वाढत आहे.
नवीन शिक्षण धोरण आणि राजीव गांधी यांचे युग
नवीन शिक्षण धोरणावर बोलताना डॉ. जोशी म्हणाले की, वाजपेयी सरकारच्या काळातही शिक्षण धोरणात बदल करण्याच्या सूचना होत्या; परंतु जुन्या धोरणाचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळले की, केवळ राजीव गांधी सरकारच्या काळात तयार केले गेले होते म्हणून धोरणात बदल करू नये. त्यावेळी जुन्या धोरणाच्या आराखड्यात आवश्यक दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या.
शिक्षण आर्थिकदृष्ट्या उत्पादक असावे
अर्थसंकल्पीय प्राधान्यक्रमांबद्दल ते म्हणाले की, रस्ते बांधणे म्हणजे विकास नाही. रस्त्यांसाठी अभियंते आणि यंत्रसामग्रीची आवश्यकता असते, ज्यासाठी एक मजबूत शिक्षण व्यवस्था आवश्यक आहे. शिक्षण आर्थिकदृष्ट्या उत्पादक असले पाहिजे. दिल्लीत एम.ए., पीएचडी आणि बी.एड. पदवीधारकांना स्वच्छता कर्मचारी म्हणून किंवा कंत्राटी पद्धतीने काम करण्यास भाग पाडले जाते. शिक्षण आणि आरोग्य हे केवळ नफ्याचे साधन असू नये, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
Related
Articles
निवडणूक कामकाजाचा कर संकलन विभागाला फटका; मालमत्ता कराच्या सेवांना विलंब
02 Sep 2026
पूर्व विभाग मजबूत स्थितीत
07 Sep 2026
शेअर बाजार घसरला
07 Sep 2026
चार हजार टन कांद्याची विक्री
07 Sep 2026
भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंड दौरा; कसोटी मालिकेपूर्वी चार दिवसीय सामने
02 Sep 2026
पाण्याचे मोजमाप करण्यासाठी मीटर रिडींग सुरू करणार
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार