E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
ज्या हिंदूला भारतात मुस्लिमांना स्थान नाही असे वाटते, तो हिंदू नाही
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : हिंदुत्व म्हणजे मुस्लिमांना वगळणे नव्हे. जर एखाद्या हिंदूचा असा विश्वास असेल की भारतात मुस्लिमांना स्थान नसावे, तर तो हिंदू नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केले. न्यूयॉर्कमध्ये आयोजित ’एक जग: एक मानवता’ धर्मनेत्यांच्या परिषदेत ते बोलत होते. या परिषदेत ख्रिस्ती, ज्यू, हिंदू आणि इस्लाम धर्मातील वक्त्यांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम ’अहेड’ (अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग) फोरमने आयोजित केला होता.
भागवत म्हणाले, जर एखाद्या हिंदूला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू राहत नाही. जर तुम्हाला स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, तर तुमचा विश्वास असला पाहिजे की, सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक माणसाला प्रतिष्ठा आहे. माणसांमध्ये कोणताही भेद नाही. सामाजिक-धार्मिक संघटना धोरणे लागू होण्यापूर्वीच त्यावर प्रभाव टाकण्याचा आणि त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करतात. राजकारण हे मोठ्या प्रमाणावर ’स्वार्थाचा खेळ’ बनले आहे. त्यामुळे, त्यांनी आपले काम समाजात राहून सुरू केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
धोरणे लागू होण्यापूर्वीच आम्ही त्यावर प्रभाव टाकण्याचा आणि त्यांना दिशा देण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला युद्धे टाळायची आहेत. त्यामुळे, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर आम्हाला राजकारणात सामील व्हावेच लागेल. पण आम्ही तिथून सुरुवात करू शकत नाही. माझा अनुभव भारताच्या पारंपरिक विचारांशी जुळतो, जो संपूर्ण मानवतेच्या एकतेवर भर देतो. आपल्या इतिहासातील नेत्यांनी नेहमीच यावर जोर दिला आहे आणि आपले संविधान हेच दर्शवते. तरीही, बदल केवळ राजकारणातून होत नाही, असे भागवत म्हणाले.
ते म्हणाले, मला हे सांगताना खेद वाटतो, पण राजकारण मोठ्या प्रमाणावर स्वार्थाचा खेळ बनले आहे. जसे योग्यच म्हटले जाते, जिथे ’मी’ आणि ’माझे’ असते, तिथे उपाय नसतात. तिथे फक्त ’आम्ही’ आणि ’आमचे’ असते. भारतातील आमच्या अनुभवाने आम्हाला शिकवले आहे की, आपण समाजापासून सुरुवात केली पाहिजे. आणि आम्ही हे काम आधीच सुरू केले आहे, असेही भागवत यांनी नमूद केले.
केवळ शब्द नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दिसायला हवे
भागवत यांच्या वक्तव्यानंतर सिब्बल यांची टीका
नवी दिल्ली : अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित फेथ लिडर्स कॉन्फरन्समध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापले असून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करताना, केवळ शब्द नव्हे तर प्रत्यक्ष कृतीही दिसायला हवी, असे म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांनी समाज माध्यमावर पोस्ट करून मोहन भागवत यांच्या दुटप्पी भूमिकेवर आक्षेप नोंदविला. विविधतेत एकता ही हिंदुस्थानची पारंपरिक विचारसरणी असून तिचे रक्षण केले पाहिजे, असे भागवत परदेशात म्हणाले. मात्र, देशात बोलताना याबाबत ते मौन का बाळगतात? परदेशात समजूतदारपणाच्या गोष्टी, पण स्वत:च्या देशात याविषयी काहीच बोलत नाही.
Related
Articles
नागरिकत्वावरील ट्रम्प यांच्या आदेशाला पुन्हा स्थगिती
04 Sep 2026
कांद्याच्या दरात पुन्हा वाढ
01 Sep 2026
व्हॉट्सऍप कट्टा
31 Aug 2026
अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवे धोरण
02 Sep 2026
डीजेविरोधात भूमिका घेणार्यास मारहाण
04 Sep 2026
गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?