नवी दिल्ली : रशियाकडून इंधनाची आयात करुन त्यावर प्रक्रिया करुन शुद्ध इंधनाचा पुरवठा भारताने रशियाकडे सुरु केला आहे. प्रामुख्याने पेट्रोलची निर्यात रशियाकडे केली जात आहे युक्रेनने रशियाचे तेल शुद्धीकरण कारखाने हल्ले करुन नष्ट केले आहेत. त्यामुळे तेथील प्रक्रिया बंद पडली आहे. दोन महिन्यांत भारतीय कंपन्यांनी दहा लाख पेट्रोलच्या पिंपाची निर्यात रशियाला केली. दरम्यान, एका पाहणी संस्थेने सांगितले की, ऑगस्टमध्ये रशियाच्या सागरी मार्गाने होणार्या पेट्रोलच्या आयातीत विक्रमी वाढ झाली असून ती दररोज सुमारे १ लाख २५ हजार पिंपे एवढी आहे.
Fans
Followers