E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मुलाला गमावलेल्या पित्याचा संताप; रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला जाब
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
देवळाली प्रवरा, (वार्ताहर) : नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे मुलाला गमावलेल्या देहरे येथील चंद्रकांत खजिनदार यांनी महामार्गाच्याकडेला लावलेला संतप्त फलक प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. ‘नगर-मनमाड रस्त्यावरील बळी हे अपघात नव्हे, तर प्रशासकीय खून आहेत!’ असा मजकूर फलकावर असून, ‘अजून किती निष्पापांचे बळी घेणार?’ असा थेट सवाल प्रशासनाला करण्यात आला आहे.
मुलाच्या मृत्यूनंतरचे दुःख मनात न ठेवता खजिनदार यांनी रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्या मुलाप्रमाणे आणखी कोणाचा जीव जाऊ नये, या भावनेतून हा फलक उभारल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गाची दुरवस्था, खड्डे आणि अपुर्या सुरक्षिततेमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. ‘जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, नगर-मनमाड रस्ता आधी चांगला करा,’ असा संतप्त संदेश त्यांनी दिला आहे.
दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या महामार्गावर वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांमध्येही तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी होत आहे.
Related
Articles
जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठाची 35 लाखांची फसवणूक
07 Sep 2026
हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश करा
05 Sep 2026
इको फ्रेंडली बाप्पांसोबत मिळणार सीड बॉल
07 Sep 2026
विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द
08 Sep 2026
दोन महिने होऊन गेले तरी कचर्याचा प्रश्न कायम
04 Sep 2026
किदांबी श्रीकांतचे आव्हान संपुष्टात
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार