E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुरवठा विभागाचा साठेबाजांना इशारा, १० टनांपेक्षा जास्त साखर आढळल्यास कारवाई
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
पंढरपूर : साखरेचे दर वाढल्याने कृत्रिम तुटवडा निर्माण करून साखरेची साठेबाजी करणार्यावर आता पंढरपूरच्या पुरवठा विभागाने कटाक्ष ठेवला आहे. कुठल्याही विक्रेत्याला १० टनांपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही. तसेच शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त भावाने साखर विक्री करता येणार नाही. अधिकचा साठा आमच्या पाहणीत आढळून आला तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा निवासी तहसीलदार बालाजी पुदलवाड व पुरवठा निरीक्षक यांनी दिला.
विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून साखरेचे दर वाढण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.या पार्श्वभूमीवर, सरकारने पुरवठा विभागाला साखरेच्या साठेबाजांवर नियंत्रण ठेवण्यासह कारवाइच्या सूचना दिल्या आहेत.निवासी तहसीलदार बालाजी पुदलवाड म्हणाले की, या सर्व प्रकरणाबाबत सरकारकडून आम्हाला नुकतीच नियंत्रण आदेश आलेला आहे. त्यामुळे पुरवठा निरीक्षकांची तातडीने पथकेही स्थापन केली आहेत. ही पथके साखरेची साठेबाजी होणार नाही, याकडे लक्ष ठेवून आहेत.
शीतपेय उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, मोठमोठ्या बेकर्या, बेव्हरीज कंपन्या, मिठाई विक्रेते आदी उद्योगांना साखर कुठून येते याची माहिती प्रशासनाकडून संकलित करण्यात येत आहे. साखरेच्या साठ्यावर मर्यादा लागू केल्यानंतर विक्रेत्यांकडील साठ्याची नियमित तपासणी, नोंदवहीतील साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा याची पडताळणी पुरवठा विभागाकडून केल्यानंतर अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कडे सादर होईल व तेथून शासनास सादर होईल अशी माहिती निवासी तहसीलदारांनी बालाजी पुदलवाड यांनी दिली.
Related
Articles
भारताची आज पाकिस्तानशी लढत
05 Sep 2026
दहशतवादाचे धोरण राबविणार्या देशाविरोधात उभे ठाका : मोदी
02 Sep 2026
अजून किती जणांना तुरुंगात टाकणार? पंडित यांच्या अटकेमुळे पुणेकरांचा संताप
06 Sep 2026
सर्व सण-उत्सवांसाठी समान ध्वनी मर्यादेचे नियम
04 Sep 2026
प्रक्रिया न्याय्य आहे का? (अग्रलेख)
07 Sep 2026
सीआयडीकडून आणखी एकास अटक
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार