E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
इंचगाव टोलनाक्यावर नियोजनाचा अभाव
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
वाहनांच्या लांबच लांब रांगा
मंगळवेढा : मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंचगाव येथील टोलनाक्यावर नियोजनाच्या अभावामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून प्रवासी व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोलनाक्यावर आठ लेन उपलब्ध असताना त्यापैकी केवळ तीन लेन सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
मंगळवेढा-सोलापूर मार्गावर इंचगाव येथे असलेल्या टोलनाक्यावर वाहनांच्या संख्येच्या तुलनेत लेनचे योग्य व्यवस्थापन केले जात नसल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. केवळ तीन लेन सुरू असल्याने प्रत्येक लेनमध्ये वाहनांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे काही वाहनचालक कमी गर्दी असलेल्या लेनमध्ये वाहने वळवत असल्याने टोलनाक्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे.
टोलनाका प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक नियोजन केले जात नसल्याने ही समस्या उद्भवत असल्याची नाराजी वाहनचालकांनी व्यक्त केली. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने प्रवाशांचा वेळ वाया जात असून प्रवासाचा त्रास वाढत आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून टोलनाक्यांवर वाहनचालकांना जलद सेवा मिळावी, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना इंचगाव टोलनाक्यावर मात्र त्याच्या उलट परिस्थिती असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
या प्रकाराची राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सोलापूर येथील अभियंत्यांनी तातडीने चौकशी करावी. तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा करणार्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करून टोलनाक्यावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
Related
Articles
पंजाबमध्ये ’आप’च्या नेत्याची हत्या
30 Aug 2026
काळ्या समुद्रातील संघर्षाचा धान्य व्यापाराला फटका
04 Sep 2026
श्रीमंती आणि विषमता
30 Aug 2026
लक्ष्य सेनकडे भारतीय आव्हानाची धुरा
01 Sep 2026
मनमानीला झटका (अग्रलेख)
04 Sep 2026
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?