E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भाजपच्या पिंपरी-चिंचवड कोअर कमिटीत फेरबदल
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पदाधिकार्यांमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव वारंवार उघडकीस येत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश समितीने शहर कोअर कमिटीत फेरबदल केला आहे. यापूर्वी २३ सदस्यांची असलेली कोअर कमिटी आता १४ सदस्यांपुरती मर्यादित करण्यात आली आहे. नव्या रचनेत युवा, महिला, महापालिकेतील पक्षनेते आणि काही प्रमुख पदाधिकार्यांना वगळण्यात आले आहे. मात्र महापालिकेच्या कामकाजाशी संबंधित निर्णयांसाठी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा कोअर कमिटीत समावेश करण्यात आल्याचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
शहर पातळीवर पक्षाचे धोरण निश्चित करणे, संघटनात्मक निर्णय घेणे आणि पक्षांतर्गत शिस्तीबाबत निर्णय घेणे, अशी महत्त्वाची जबाबदारी कोअर कमिटीकडे असते. कमिटीच्या मान्यतेशिवाय किंवा चर्चेविना पदाधिकारी व नगरसेवकांनी कोणत्याही विषयावर माध्यमांसमोर अथवा जाहीरपणे भूमिका मांडू नये, असा पक्षांतर्गत नियम आहे. महापालिकेच्या कामकाजात किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पक्षविरोधी भूमिका घेणार्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकारही कमिटीकडे आहे. त्यामुळे भाजपच्या शहर संघटनेत कोअर कमिटीला विशेष महत्त्व आहे.
समन्वयाच्या अभावाची प्रदेश समितीकडून दखल
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निर्णय प्रक्रियेत सत्ताधारी भाजपमध्ये अनेकदा गोंधळाचे चित्र दिसून आले आहे. पदाधिकार्यांमधील समन्वयाचा अभाव विविध प्रसंगांतून समोर आला असून, त्यावरून विरोधकांकडून भाजपवर टीकाही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रदेश समितीने शहरातील पक्षाच्या कामकाजाची दखल घेत कोअर कमिटीची पुनर्रचना केल्याची चर्चा आहे. प्रदेश समितीच्या निर्देशानुसार शहर कोअर कमिटीतील सदस्यसंख्या २३ वरून १४ करण्यात आली आहे. ही कमिटी प्रामुख्याने शहर संघटनेच्या कामकाजासाठी असून, महापालिकेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी नियमित कोअर कमिटीसोबत सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा समावेश करण्यात आला आहे, असे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्पष्ट केले.
पदाधिकार्यांना कानउघडणी
भाजप प्रदेश समितीने महापालिका पदाधिकार्यांना काही स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महापालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, शहर विकासाच्या प्रश्नांवर पदाधिकार्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे आणि त्यांच्या वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेशी संबंधित निर्णय घेण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीसोबत सदस्य म्हणून काम करणार आहे. महापालिकेच्या कामकाजाबाबत समितीत चर्चा करून धोरण निश्चित केले जाईल आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महापालिकेत केली जाईल. पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात येईल, ती प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.
कोअर कमिटीतील १४ सदस्य
भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर कोअर कमिटीत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, महापौर रवी लांडगे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, पक्षाचे प्रभारी भरत पाटील, शहर कार्यकारिणी सरचिटणीस वैशाली खाड्ये, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, विकास डोळस आणि माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांचा समावेश आहे.
Related
Articles
अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्र भासविण्याचा सरकारचा प्रयत्न
04 Sep 2026
स्टॅलिन यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
04 Sep 2026
भारतीय नागरिकांमुळे विकास दराचा विक्रम
01 Sep 2026
कास फुलोत्सवास आजपासून प्रारंभ
01 Sep 2026
नेत्रदानातून दाखवा दृष्टीहीनांना प्रकाशाचा किरण
02 Sep 2026
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचे प्रमाण द्या
01 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?