E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आरोग्य विभागाला सुविधांची प्रतीक्षा
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ व ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांसह विविध आरोग्य विभागांत कार्यरत कर्मचार्यांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणार्या कर्मचार्यांनाच आवश्यक साधनसामग्री, स्वच्छ कार्यस्थळ, आर्थिक तरतूद आणि पायाभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजी आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, डास नियंत्रण, रोगप्रतिबंधक उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य तपासणी यांसह विविध कामे केली जातात. मात्र ही कामे करणार्या कर्मचार्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यास त्याचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे.
महापालिका नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा दावा करत असताना त्या सुविधा प्रत्यक्षात पोहोचविणार्या कर्मचार्यांच्या मूलभूत गरजांकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कर्मचार्यांना आवश्यक निधी, साधने आणि पायाभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व क्षेत्रीय कार्यालये व आरोग्य विभागांची नियमित पाहणी करावी. तेथील त्रुटी दूर करून कर्मचार्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुरज कुंभार म्हणाले, आरोग्य कर्मचार्यांना सुरक्षा साधने पालिकेच्या नियमानुसार दिले जातात काही कर्मचारी हे कचरा वेचक व इतर ठेकेदाराच्या अंतर्गत काम करतात त्यांना ठेकेदारांनी सुरक्षा साहित्य व साधने पुरवणे आवश्यक असून त्या संदर्भात सूचना दिल्या जातील.
काय आहेत समस्या
* कर्मचार्यांसाठी स्वच्छ कपडे, हातामोजे, मास्क, सुरक्षा जाकीट, बूट उपलब्ध नाही
* पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याची तक्रार
* आरोग्य विभागासाठी आवश्यक साहित्य, साधनसामग्रीचा अभाव
* कार्यालयीन पायाभूत सुविधांची कमतरता
* खराब किंवा अपुर्या आसनव्यवस्था
* पावसाळ्यात परिसरात पाणी साचणे, चिखल व अस्वच्छता
या उपाययोजनांची गरज
* सर्व आरोग्य कार्यालयांची सुविधा तपासणी करावी
* स्वच्छ पाणी व स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी
* आवश्यक आरोग्य व सुरक्षा साहित्य तातडीने उपलब्ध करून द्यावे
* कार्यालयांची दुरुस्ती व पायाभूत सुविधांचे काम करावे
* आरोग्य कर्मचार्यांच्या आर्थिक व सेवा-सुविधांशी संबंधित प्रलंबित मागण्यांचा आढावा घ्यावा
* महिला कर्मचार्यांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध कराव्यात
* आवश्यक वाहने, उपकरणे व औषध फवारणीची साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावीत
* प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी करावी
Related
Articles
एसआयआर कायदेशीर; पण योग्य नाही
05 Sep 2026
द्रमुकच्या भ्रष्टाचाराचा पाढा विजय यांनी विधानसभेत वाचला
07 Sep 2026
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
02 Sep 2026
खगोलीय वेळ दर्शवणारी यंत्रे राज्य मंत्रालयात बसविणार
05 Sep 2026
चिमुकल्यांची राज यांना भावनिक साद
05 Sep 2026
प्रत्येक अंगणवाडीला मिळणार हक्काची जागा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार