E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाइफस्टाइल
नारळाच्या करवंटीला कल्पकतेचे कोंदण
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
जयश्री कुलकर्णी
निसर्ग आपल्याला भरभरून देतो. माणूस संवेदनशील असेल; तर त्याचा कणही वाया जाऊ देत नाही. नारळाची गोष्टही अशीच. शहाळ्यातून पाणी मिळतं नारळातून दूध, तेल, खोबरं हे सर्व मिळाल्यानंतर करवंटी तेवढी टाकून दिली जाते; पण तीच जर एखाद्या सर्जनशील हातात पडली तर, तिचे नशीब बदलू शकते. अशाच एका निसर्गप्रेमी असणार्या वर्षा हुल्ले यांना टाकाऊ करवंटीत सुंदर कलाकृती साकारण्याची शक्यता दिसली, त्यांनी करवंटीपासून विविध आकर्षक वस्तू तयार केल्या. केवळ छंद म्हणून न पाहता त्याचे त्यांनी व्यवसायात रुपांतर केले. पर्यावरणपूरक वस्तूंना मागणी वाढत गेली. या व्यवसायात त्यांना त्यांची सहकारी कल्पिता भावे यांची मोलाची साथ आहे.
त्या सांगतात ’’मी एक पर्यावरण अभियंता असल्यामुळे मला पर्यावरणाला अनुकूल अशा व्यवसाय करावा असे वाटत होते. एकदिवस माझ्या भाच्याने करवंटीपासून एक वस्तू तयार करून मला दाखवली. यापुर्वी करवंटीपासून तयार होणार्या वस्तू मी कधीच कुठे पाहिल्या नव्हत्या. आपण असेच काहीतरी करावं असा निश्चय मनात केला. ही एक वेगळीच कला ठरेल असे मला वाटले आणि करवंट्या गोळा करून मी कामाला लागले.’’
सर्वांत आधी त्यांनी चहाचा कप आणि मोबाईल स्टॅण्ड या वस्तू तयार केल्या. त्या अनेकांना आवडल्या. मग आणखी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्यास कारागिरांना सांगितले. कारागिराने करवंट्या काळजीपूर्वक स्वच्छ करून घासल्या, आकार दिला, कुठे रंगांची उधळण केली, तर कुठे करवंटीचा नैसर्गिक रंग तसाच जपला. एका करवंटीपासून त्याने छोटी वाटी बनवली. काही करवंट्यांचे सुंदर दिवे बनवले. त्यावर कोरीव काम करून त्यापासून गळ्यातले, कानातले, फुलदाण्या, विविध रुप घेत करवंटीपासून शोभेच्या वस्तू तयार झाल्या. नारळाला श्रीफळ संबोधतात म्हणून त्यापासून त्यांनी गणपती साकारला. उदबत्ती आणि धूप दाणी, सोपकेस, कप, डाव, चमचे, वाईन ग्लास आणि सजावटीच्या विविध वस्तू त्यांच्या कल्पनेतून तयार झाल्या. प्रत्येक वस्तू वेगळी, ठेवण वेगळी. करवंटीचे नैसर्गिक रूप कायम ठेवून त्यांनी बहीण भावाचे नातं घट्ट विणणार्या राख्या तयार केल्या. साध्या करवंटीला त्यांच्या हातांनी एक नवे जीवन मिळाले.
करवंटीचा आकार हा गोल असल्याने, त्याला अनुसरुनच वस्तू तयार करणे आले. नारळ फोडण्यापासून ते त्यापासून नव्यारुपात वस्तू तयार करणे हे काम खूप कौशल्याने करावे लागते. त्या करवंटीला नवा आकार देऊन ती वस्तू रुपात जिवंत राहणार याविचारातून ’सोल इन शेल’ (र्डेीश्र ळप डहशश्रश्र) हे नाव सुचलं आणि कंपनीसाठी याच नावाची रीतसर नोंदणी केली गेली.
’सोल इन शेल’ च्या संस्थापिका वर्षा हुल्ले यांनी यापुर्वी बऱ्याच नामांकित संस्थांमध्ये १५ वर्षांहून अधिक काळ काम केले. ’’करवंटीपासून वस्तू करण्याचा हा व्यवसाय करणारे दक्षिण भारतात अनेक आहेत. परंतु महाराष्ट्रात फार कमी असून ते अतिशय छोट्या प्रमाणात व्यवसाय करणारे आहेत. पुण्यात तरी हा व्यवसाय करणारे दिसत नाहीत.’’ असेही त्यांनी नमूद केले.
’’2024 मध्ये मी या व्यवसायाला सुरु केली आणि हा व्यवसाय ’प्रोफेशनल कॉर्पोरेट’ पद्धतीने पुढे न्यायचे ठरवले. हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी वर्षा यांना त्यांची सहकारी कल्पिता भावे यांची मोलाची साथ आहे. या सर्व वस्तू तयार करण्यासाठी 3,4 प्रकारच्या करवंट्या लागतात. या करवंट्या कोकण, तामिळनाडू आणि केरळ येथून मागवल्या जातात. करवंटी स्वच्छ करणे, तिच्यावर कोरीवकाम करून रंगकाम करणे, छोटी नक्षी काढणे-या सगळ्यातून कल्पनाशक्तीला वाव मिळतो. टाकाऊ वस्तूपासून सुंदर वस्तू निर्माण करण्याचा आनंद मिळतो. अर्थपूर्ण दैनंदिन वस्तू तयार करून प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि प्रत्येक कुटुंबाला किमान एक तरी शाश्वत पर्याय स्वीकारण्यास प्रेरित करणे हे माझे स्वप्न आहे.’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
निरुपयोगी समजत असलेल्या करवंटीला त्यांनी आपल्या कलेच्या स्पर्शाने अर्थ दिला. तिचे रूप पालटलेे, तिचे निसर्गाशी असलेले नाते मात्र तसेच ठेवले. या कामामध्ये केवळ कल्पकता नाही, तर पर्यावरणाची जाणीवही आहे.
त्या सांगतात, ’’हा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्या आणि त्यांची सहकारी कल्पिता दोघीमिळून विविध उपक्रम राबवतात, पर्यावरण दिनानिमित्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठात, सीएसआर ऍक्टिव्हिटी दरम्यान बर्डनेस्ट ही एक नवीन गोष्ट दिली गेली. नुकताच इचलकरंजी येथील हुल्ले प्राथमिक विद्यालयात इको-फ्रेंडली राखी बनवा हा उपक्रम केला. करवंटीपासून राखी तयार करण्यात विद्याथ्यांना सहभागी करून घेतले. त्याला विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. आमचे प्रॉडक्ट अशा कल्पवृक्षापासून तयार केले आहे, जे शंभकटक्के झिरो वेस्ट समजले. जाते. जगामध्ये नारळाच्य उत्पादनात भारत हा तिसर्या क्रमांकावर आहे, नारळाच्या करवंट्या मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे प्लास्टिकला पर्याय म्हणून या वस्तूंकडे बघता येणे शक्य आहे.’’
Related
Articles
पुणेकरांना त्रास होणार नाही याचा प्रशासनाने विचार करावा : श्रीकांत पाटील
31 Aug 2026
दोन महिने होऊन गेले तरी कचर्याचा प्रश्न कायम
04 Sep 2026
इंचगाव टोलनाक्यावर नियोजनाचा अभाव
31 Aug 2026
भारताचा आज थायलंडविरुद्ध सामना
30 Aug 2026
वायसीएम रुग्णालयात एफडीएचा छापा
02 Sep 2026
काळ्या समुद्रातील संघर्षाचा धान्य व्यापाराला फटका
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?