E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विधी संघर्षग्रस्त बालकांना नवजीवनाचा संदेश
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
पुणे पोलिसांचा सिंहगडवर उपक्रम
पुणे : गुन्हेगारी प्रवृत्तीपासून विधी संघर्षग्रस्त बालकांना दूर करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शहर पोलिसांनी एक विधायक आणि संवेदनशील उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत ५० विधी संघर्षग्रस्त बालकांना नवजीवनाचा संदेश देण्यात आला.
परिमंडळ ३ चे पोलिस आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंहगड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार यांच्या देखरेखीखाली उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच विधी संघर्षग्रस्त बालकांच्या सुधारणा, पुनर्वसन आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक विकास घडविणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. बालकांना ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर नेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. गुन्हेगारीचा मार्ग सोडून शिक्षण, मेहनत आणि सन्मानाच्या बळावर जबाबदार व यशस्वी जीवन कसे जगता येईल, याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
संवादात्मक सत्रादरम्यान पोलिस अधिकार्यांनी बालकांशी मनमोकळा संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, विविध करिअरच्या संधी, कौटुंबिक मूल्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्यांच्या भविष्यावर होणारे दुष्परिणाम याविषयी सविस्तर चर्चा केली. समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन सकारात्मक योगदान देणारे जबाबदार नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यात आले. यावेळी ‘से नो टू ड्रग्स, यस टू लाईफ’ हा संदेश देत व्यसनाधीनतेचे गंभीर दुष्परिणामही बालकांना समजावून सांगण्यात आले.
अंमली पदार्थ व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, आगामी काळात त्यांच्या व्यसनमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
हा उपक्रम झोन-३ मधील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे पोलिस निरीक्षक तसेच विविध पोलिस ठाण्यांतील गुन्हे शोध पथक आणि सर्व्हलन्स पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी यशस्वीपणे राबविला. पोलिसांच्या या संवेदनशील आणि मानवतावादी उपक्रमाचे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
04 Sep 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
30 Aug 2026
अल्काराझपुढे जेतेपद राखण्याचे आव्हान
30 Aug 2026
थेरगाव 16 नंबर ते बारणे कॉर्नर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
01 Sep 2026
प्रत्येकाने जबाबदारीने वागावे अशी अपेक्षा
01 Sep 2026
पाकिस्तानात १५ बंडखोर ठार
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?