E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
Samruddhi Dhayagude
02 Sep 2026
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी
पुणे
: कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी आज (बुधवारी) पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित जिल्ह्यात मेघगर्जना व वीजांचा कडकडाट होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे, तर ठाणे आणि मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडेल. कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हिंगोली, नांदेड, लातूर येथे विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांत मेघर्जना व वीजांचा कडकडाट होणार आहे.
पाच वर्षांपासून परतीचा पाऊस कमीच
मराठवाड्यात गेल्या पाच वर्षांत परतीच्या पावसाचे प्रमाण अपेक्षेच्या तुलनेत कमी राहिले आहे. त्यामुळे यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच एल निनोचा परिणाम कायम राहिल्यास परतीच्या पावसावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. 4 सप्टेंबरपासून पावसाचे आगमन होणार असले, तरी हा पाऊस किती प्रभावी ठरणार, हा खरा प्रश्न आहे. परतीच्या पावसाने हजेरी न लावल्यास या भागातील पिकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
पुण्यात ऊन आणि उकाडा
मागील तीन दिसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसभर ऊन पडत असून तपमानात वाढ झाली आहे. परिणामी ऊकाडाही वाढला आहे. मात्र आज (बुधवारी) शहर व परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहणार असून हलक्या पावसाचा अंदाज आहे. पाऊस पडल्यास नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. काल पुण्यात 30 अंश कमाल, तर किमान 21.8 अंश तपमानाची नोंद झाली.
Related
Articles
पाकिस्तानात १५ बंडखोर ठार
04 Sep 2026
गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांसाठी दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार
07 Sep 2026
अमलीपदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नवे धोरण
02 Sep 2026
चेन्नईची जलक्रांती महाराष्ट्रातही व्हावी
06 Sep 2026
इस्रोचे खासगीकरण नाही
08 Sep 2026
कोयना पूर्ण क्षमतेने भरले
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
गती कायम राहील का? (अग्रलेख)
3
वाचक लिहितात
4
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
5
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार
6
गणेशोत्सव डीजेमुक्त करूया !