बालविवाहातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; ३० वर्षीय पतीविरुद्ध गुन्हा   

बार्शी : अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही मुलीशी बालविवाह करून तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाविरुद्ध बार्शी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. 
 
२५ ऑगस्ट २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत बार्शी तालुक्यातील एका गावच्या शिवारातील पत्राशेडमध्ये हा प्रकार घडला. पीडित मुलगी १७ वर्षे ९ महिन्यांची असताना आरोपीने तिच्याशी विवाह केला. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही विवाह केल्यानंतर आरोपीने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदर राहिली आणि तिची प्रसूती झाली. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलिसांनी आरोपीविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियमातील कलम ९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के करीत आहेत.

Related Articles