E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
न्यायाधीशांच्या बंगल्यावर चोरट्यांचे लक्ष्य
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
साडेतीन महिन्यांत दोनदा चोरीचा प्रयत्न
पुणे : नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात कार्यरत असलेल्या एका न्यायाधीशांच्या वारजे माळवाडी येथील बंगल्याला चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे. साडेतीन महिन्यांच्या कालावधीत या बंगल्यात दोनदा चोरीचा प्रयत्न झाला असून, दोन्ही घटनांमागे एकाच चोरट्याचा सहभाग असल्याचा संशय सीसीटीव्ही चित्रीकरणातून व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश तथा अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कौस्तुभ मराठे यांनी तक्रार दिली. मराठे यांचे मूळ गाव पुणे असून, वारजे माळवाडीतील रेणुकानगर येथे त्यांचा बंगला आहे. सध्या ते नागपूर येथे न्यायसेवेत कार्यरत असल्याने त्यांचा बंगला बंद आहे. ९ मे रोजी या बंगल्यातून एसीचा कॉम्प्रेसर आणि कॉपर वायर चोरीला गेले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी पहाटे अडीच ते साडेतीनच्या सुमारास पुन्हा एका चोरट्याने बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे तसेच स्वच्छतागृहाचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार शेजार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चोरट्याला हटकले. त्यामुळे चोरटा तेथून पसार झाला. शेजार्यांनी तत्काळ मराठे यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मोबाइलद्वारे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून पोलिसांकडे तक्रार केली.
दोन्ही वेळेस एकच चोर?
९ मे आणि १८ ऑगस्ट रोजी झालेल्या घटनांचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, दोन्ही वेळेस चोरीचा प्रयत्न करणारी व्यक्ती एकच असल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ऑटो डिलिट होण्यापूर्वी ते तातडीने ताब्यात घेऊन तपास करणे आवश्यक असून, त्यातून चोरट्याने वापरलेल्या वाहनाची माहिती मिळू शकते, असेही तक्रारीत म्हटले आहे.
नागपूरमध्येही झिरो एफआयआर
या प्रकरणी नागपूरच्या अंबाझरी पोलिस ठाण्यात झिरो एफआयआर नोंदविण्यात आला आहे. पुढील तपासासाठी तो वारजे पोलिस ठाण्याकडे पाठविण्यात आला आहे. या दोन्ही चोरीच्या प्रयत्नांचा तपास सध्या वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत.
Related
Articles
प्रारूप मतदार यादी आज जाहीर होणार
31 Aug 2026
भारताला महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
04 Sep 2026
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ
02 Sep 2026
खाद्यपदार्थ पुरवणे, मृतदेह हलविण्यासाठी ड्रोनचा वापर
03 Sep 2026
इनर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी कालबद्ध आराखडा
30 Aug 2026
इंचगाव टोलनाक्यावर नियोजनाचा अभाव
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?