रबाडाला दुखापत; वनडे मालिकेतून बाहेर   

जोहान्सर्बग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा दुखापतीमुळे पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. त्याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली असून, ऑक्टोबरमध्ये होणार्‍या कसोटी मालिकेत खेळण्याबाबतही साशंकता आहे.
 
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने २१ ऑगस्टला सांगितले होते की, आठवड्याच्या सुरुवातीला सरावादरम्यान रबाडाला दुखापत झाली. आफ्रिकन वेबसाइट ‘रॅपोर्ट’ने लायन्स संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अ‍ॅलन डोनाल्ड यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, रबाडाच्या उजव्या हॅमस्ट्रिंगला ग्रेड-३ दुखापत झाली असून तो ९ ते १० आठवडे मैदानाबाहेर राहू शकतो. ही कालमर्यादा पाहता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २४, २७ आणि ३० सप्टेंबरच्या वनडे सामन्यांबरोबरच ऑक्टोबरमधील कसोटी मालिकेतील बहुतांश सामन्यांनाही तो मुकण्याची शक्यता आहे. उड॒ ने स्पष्ट केले की, रबाडा वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार आणि पुनर्वसन प्रक्रियेत आहे. कसोटी मालिकेतील त्याचे पुनरागमन हे रिहॅबिलिटेशनच्या प्रगतीवर अवलंबून असेल.

Related Articles