E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
फेडररचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
न्यूपोर्ट : महान टेनिसपटू रॉजर फेडरर याचा शनिवारी इंटरनॅशनल टेनिस ‘हॉल अ ॉफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला. या सोहळ्यादरम्यान फेडरर भावूक झाला. २० ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावलेल्या फेडररच्या सुमारे ३० मिनिटांच्या भाषणादरम्यान अनेक वेळा अश्रू अनावर झाले.पत्नी मिर्काचा उल्लेख करताना तर फेडररला अश्रू आवरणे कठीण झाले. मिर्काच्या स्वागतपर परिचयानंतर फेडररला मंचावर आमंत्रित करण्यात आले. यावेळी विनोदाच्या शैलीत तो म्हणाला की, ‘‘मला सध्या रुमाल आणि गॉगलची गरज आहे.’’ मात्र, अश्रू रोखणे त्याच्यासाठी कठीण जात होते. ४५ वर्षीय फेडररने मंचावर येताच म्हटले, ‘‘हा क्षण खूप मोठा आहे आणि त्यानंतर बोलणे सोपे नसेल.’’ त्यानंतर त्याने पत्नी मिर्काला मिश्कीलपणे विचारले, ‘‘तुम्ही याची तयारी माझ्यापासून लपून तर केली नव्हती ना?’’
फेडररने आपल्या भाषणात बालपणीचा आदर्श स्टीफन एडबर्ग तसेच दीर्घकाळ त्याचे प्रशिक्षक राहिलेले सेवेरिन लुथी यांचीही आठवण काढली. ‘स्विस मास्ट्रो’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या फेडररने आपल्या शानदार कारकीर्दीत आठ विंबल्डन, सहा ऑस्ट्रेलियन ओपन आणि एक फ्रेंच ओपन विजेतेपद पटकावले.
Related
Articles
प्रक्रिया न्याय्य आहे का? (अग्रलेख)
07 Sep 2026
साखर झाली पाच रुपयांनी स्वस्त
06 Sep 2026
जॉर्जिया मेलोनी यांचे मोदींकडून अभिनंदन
05 Sep 2026
पाटस टोलनाक्यावर ओबीसी बचाव
02 Sep 2026
कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त
07 Sep 2026
जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार