E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दुसर्या कसोटीत पाकिस्तान पराभवाच्या छायेत
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
लंडन : इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेल्या दुसर्या कसोटी सामन्याला निर्णायक वळण मिळाले आहे. इंग्लंडने पाकिस्तानसमोर ३८९ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये आजवर एवढ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झालेला नाही. पाकिस्तानच्या दुसर्या सत्रात ५ बाद १३१ धावा झाल्या होत्या. त्यांना २५६ धावा करायच्या असल्याने संघ पराभवाच्या छायेत आहे. सौद शकील ७१ तर अली उस्मान १० धावांवर खेळत होते.
लॉर्डसवर सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. १९८४ मध्ये इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिजने ३४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ३४४ धावा केल्या होत्या. गॉर्डन ग्रीनिजने नाबाद २१४ धावांची तुफानी खेळी करत वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर संपुष्टात आला. जॉर्डन कॉक्सने ५५, तर जेमी स्मिथने ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव अवघ्या ११० धावांत आटोपला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात १८० धावांची आघाडी मिळाली. दुसर्या डावात इंग्लंडने २०८ धावा केल्या. १७७/७ या धावसंख्येवरून संघाने आणखी ९ धावा जोडल्या असताना डेन लॉरेन्सला मोहम्मद अब्बासने त्रिफळाचीत केले. ओली रॉबिन्सनला केवळ ८ धावांवर माघार घ्यावी लागली, तर जोश टंग १२ धावांवर धावबाद झाला.
Related
Articles
पुराचा ठपका भारत, चीन आणि अमेरिकेवर
03 Sep 2026
बेन स्टोक्स आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये दिसणार; अॅडलेड स्ट्रायकर्सकडून करार
02 Sep 2026
गदर पार्टीचे राजदूत - डॉ. मथुरा सिंह
04 Sep 2026
हिंजवडीसह सात गावांचा महापालिकेत समावेश करा
05 Sep 2026
गणेशोत्सव डीजेमुक्त करूया !
03 Sep 2026
अवघ्या ४८ तासांत डांबर उखडले
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार