E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पूर्व विभागाने मध्य विभागाला २६६ धावांत गुंडाळले
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
मुकेश कुमार, सरकारचे प्रत्येकी तीन बळी
बंगळुरू : भारतीय वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अभिजीत सरकार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतल्याने पूर्व विभागाने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या दिवशी रविवारी मध्य विभागाचा डाव २६६ धावांत संपुष्टात आणला. पूर्व विभागाचा कर्णधार ईशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय योग्य ठरला. मुकेशने ५६ धावांत तीन, तर सरकारने ३८ धावांत तीन बळी घेतले. मोहम्मद शमीने ४२ धावांत, तर ऑफस्पिनर एमडी कौनैन कुरेशीने ४९ धावांत प्रत्येकी दोन बळी मिळवले. मध्य विभागाचा संपूर्ण संघ ८०.१ षटकांत तंबूत परतला. मध्य विभागाकडून रिंकू सिंहने ८८ चेंडूंत ६० धावांची खेळी केली. सलामीवीर आणि यष्टिरक्षक आर्यन जुयालने ४६ धावा केल्या.
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर मध्य विभागाची सुरुवात खराब झाली. रिंकू सिंह आणि हर्ष दुबे (२७) यांनी सहाव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी करत मध्य विभागाला काहीसा आधार दिला. मध्य विभागाचा डाव२६६ धावांवर आटोपला.
उत्तर विभागाला १९५ धावांत गुंडाळले
कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विद्वत कावेरप्पाच्या चार बळींच्या जोरावर दक्षिण विभागाने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या दिवशी रविवारी उत्तर विभागाचा पहिला डाव १९५ धावांत गुंडाळला. कावेरप्पाने ६६ धावा देत चार बळी घेतले. केरळच्या एमडी निधीशने ३६ धावांत दोन, तर तनय त्यागराजनने ३१ धावांत दोन बळी मिळवले. कवुरी साईतेजा आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पहिल्या डावात दक्षिण विभागाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण विभागाने २ बाद ४० धावा केल्या होत्या. नारायण जगदीशन ३४ धावांवर, तर कर्णधार तिलक वर्मा खाते न उघडता खेळपट्टीवर होते.दक्षिण विभाग अजूनही उत्तर विभागापेक्षा १५५ धावांनी पिछाडीवर असून त्याचे आठ फलंदाज बाकी आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण १२ बळी गेले. उत्तर विभागाकडून जम्मू-काश्मीरचा सलामीवीर कामरान इक्बालने १८२ चेंडूंत ७६ धावांची झुंजार खेळी केली.
Related
Articles
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा इशारा
03 Sep 2026
वायसीएम रुग्णालयात एफडीएचा छापा
02 Sep 2026
एनआयएच्या आरोपपत्राची दिल्ली न्यायालयाकडून दखल
30 Aug 2026
राज्यात २ कोटी ६ लाख मतदारांची नावे वगळली!
01 Sep 2026
व्हाट्सऍप कट्टा
04 Sep 2026
व्हाट्सऍप कट्टा
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?