E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
दोन देशांवर कोळशाची मदार
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
वृत्तवेध
जगभरात स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जात असला, तरी कोळशाची मागणी अद्यापही मोठ्या प्रमाणात कायम आहे. ऊर्जा संस्थेच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये जगातील एकूण कोळसा वापरापैकी जवळपास ७० टक्के कोळसा केवळ चीन आणि भारताने वापरला. चीन हा जगातील सर्वात मोठा कोळसा वापरणारा देश ठरला असून भारत दुसर्या क्रमांकावर आहे.
अहवालानुसार, चीनने २०२५ मध्ये तब्बल ९२.२ एक्साजूल कोळशाचा वापर केला. हा जगातील एकूण कोळसा वापराच्या ५५.६ टक्के हिस्सा आहे. भारताने याच काळात २३.१ एक्साजूल कोळसा वापरला. जागतिक वापरात भारताचा वाटा सुमारे १४ टक्के राहिला. म्हणजेच चीन आणि भारताचा एकत्रित वाटा जवळपास ७० टक्क्यांवर पोहोचतो. चीनमध्ये वीजनिर्मितीबरोबरच उत्पादन उद्योग आणि विविध औद्योगिक क्षेत्रांचा मोठा विस्तार झाल्यामुळे कोळशाची गरज मोठी आहे. भारतातही वीजनिर्मिती आणि औद्योगिक विकासासाठी कोळशावर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागते. चीन आणि भारतानंतर अमेरिका कोळसा वापरणार्या देशांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे. २०२५ मध्ये जागतिक कोळशाच्या मागणीत वाढ होण्यामागे दक्षिण-पूर्व आशियातील देशांचाही मोठा वाटा राहिला. इंडोनेशिया आणि व्हिएतनामसारख्या वेगाने विकसित होणार्या देशांमध्ये विजेची मागणी वाढत असल्याने कोळशावर आधारित वीज प्रकल्पांचा वापर वाढला आहे. या दोन्ही देशांमध्ये २०१५च्या तुलनेत कोळशाचा वापर दुपटीपेक्षा अधिक झाला आहे.
दरम्यान, अमेरिकेत २०२५ मध्ये कोळशाच्या वापरात सुमारे दहा टक्क्यांची वाढ झाली. कोळशाच्या मागणीत झालेल्या मोठ्या वाढीपैकी ही एक वाढ मानली जात आहे. दुसरीकडे, युरोपमध्ये चित्र वेगळे आहे. जर्मनी, पोलंड आणि चेकिया हे अजूनही युरोपमधील कोळसा वापरणारे मोठे देश असले, तरी अनेक युरोपीय देशांमध्ये कोळशावर आधारित वीज प्रकल्प बंद केले जात आहेत.
Related
Articles
महागाई ‘डाचत’ नाही..?
30 Aug 2026
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे
31 Aug 2026
टी-२० कर्णधारपदावरून हटवले तेव्हा धक्का बसला : सूर्यकुमार
31 Aug 2026
लष्करासाठी ‘स्पर्श’द्वारे पेन्शनची माहिती
04 Sep 2026
राम मंदिर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी जितेंद्र मिश्रा
03 Sep 2026
४१ लाखांची खंडणी गोव्यातील दोघांवर मुंबईत गुन्हा
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?