E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
विसंवादाशी संवाद
डार्विन गेला सांगून
प्राण्यांचा मूळधर्म
अस्तित्वासाठी संघर्ष
स्वतःचेच अस्तित्व आणि
श्रेष्ठत्व टिकवू पाहणारी बिजे काट्यात झाली आहेत रूपांतरीत
अगदी कट्टर आणि
अधिकाधिक टोकदार
फक्त डागण्यासाठी इतरांना
एक जगू पाहतो
हुकूमशहा म्हणून
मुठीत सगळे जग घेऊन
गाजवू पाहतो हुकूमत
कधी शब्दांचे तर कधी दुधारी नजरेचे बाण
वापरून
सुशिक्षित,सुसंस्कृत असल्याचे शहाणपण विसरून
दुसरा हतबलतेने सारेच ऐकत राहतो
मनाविरोधी काही मनासारखे
चेपवाचेपवीचा खेळ आजही चालू आहे सराईतपणे
उदरनिर्वाहाच्या आणि उदरभरणाच्याही ठिकाणी जगणं असं सहज आणि बिनकष्टाचे होताना
एवढा तर ते
करणारच ना संघर्ष
मालक म्हणून
राज्य करण्यासाठी
हे पुरेपूर पटलं आहे काहींना
शेवटी गुलामी आमच्या रक्तातच पेरलेली आहे
कसणारा भेटला, की छाताडावर उभा राहतोच कणखरपणे हयातभर नमविण्यासाठी
अशा विसंवादाशी माझा संवाद चालू आहे दिवस-रात्र आणि
शोधत आहे अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे
समाजव्यवस्थेकडून मिळतील या आशेने कधीतरी या विस्कटत चाललेल्या नात्यांना
भ्रष्ट होत चाललेल्या वृत्तीला
आटत चाललेल्या झर्याला
फुटतील का कोंब
सुसंवादाचे?
फुलतील का मळे माणुसकीचे?
डोलतील का राने आनंदाने?
खळाळतील का झरे घराघरातले?
चालतील का सारे समानतेच्या वाटेने
अखिल मानवतेच्या सुखासाठी?
- मनिषा शिरटावले
मो.: ९२७००२०१२३
Related
Articles
जर्मनीत स्फोटानंतर रेल्वे स्थानक बंद
03 Sep 2026
पीसीबीच्या निर्णयांवर मिस्बाह नाराज; निवड समितीतून राजीनाम्याची तयारी
02 Sep 2026
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेर्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार
03 Sep 2026
‘रेज ऑफ बिलीफ’ची भांडवल उभारणी : हेतु सामाजिक, मात्र नफ्याचा उद्देश
31 Aug 2026
जनतेशी थेट नाळ जोडा
03 Sep 2026
सेबीचे सीएएस की तकेशीचा कॅसल?
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?