बिकानेरमधील अपघातात बालकासह तिघांचा मृत्यू   

बिकानेर : राजस्तानच्या  बिकानेर जिल्ह्यात मोटार अपघात नवजात बालकासह तिघांचा मृत्यू झाला आणि अन्य तिघे जखमी झाले. अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. 
शनिवारी संध्याकाळी भादल गावाजवळ दुर्घटना घडली.  रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर आई आणि तिचे नवजात बालक घरी मोटारीतून परतत होेते. फलोदी येथील मडासर गावातील हे कुटुंब प्रवास करत होते. त्यांची मोटार  दुसर्‍या वाहनाला धडकली आणि काही क्षणांतच मागून येणार्‍या एका मोटारीने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. जखमींना  बज्जू येथील रुग्णालयात नेण्यात आले. 

Related Articles