मुंबई : बांधकाम कंपनीकडे ४१ लाख रुपयांची खंडणी मागणार्या दोघांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित गोव्याचे रहिवासी असल्याचे उघड झाल्यानंतर कारवाई केली. 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' कंपनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, आरोपींनी ६ कोटींची खंडणी मागितली होती. ती दिली नाही तर बांधकाम रोखले जाईल, अशी धमकी दिली होती. एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्याबाबतचा गुन्हा २७ ऑगस्ट रोजी दाखल झाला होता. त्यानुसार सिद्धेश जना तारी, प्रितेश साळगांवकर आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल केला. तारी याने ३४ लाख तर साळगांवकर याने ७ लाख रुपये घेतले होते. पाच महिन्यांत रक्कम टप्प्याटप्प्याने त्यांना देण्यात आली होती. यानंतर आरोपींनी आणखी दहा लाख रुपये नुकतेच मागितले होते. खंडणीसाठी वारंवार धमक्या दिल्या जात असल्याने वैतागून कंपनीने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली होती.
Fans
Followers