E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
२२० हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग
पुणे : ‘केसरी’ गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी रविवारी गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह खुल्या गटातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटांतील २२० हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी संयोजकांकडून प्रत्येक स्पर्धकाला गणेशमूर्ती देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी कल्पकतेनुसार मूर्तीला आकर्षक रंग दिले. वेगवेगळ्या रंगांचा वापर करून त्यांनी गणरायाची सुंदर आणि लोभस रूपे साकारली. काही विद्यार्थ्यांनी पारंपरिक रंगसंगतीला पसंती दिली, तर काहींनी आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून गणेशमूर्तीला वेगळे आणि आकर्षक रूप दिले.
स्पर्धकांनी शांतपणे आणि एकाग्रतेने मूर्ती रंगविण्याचा आनंद घेतला. रंगांची निवड, त्यांचा योग्य वापर आणि मूर्तीची सजावट करताना विद्यार्थ्यांमधील कलात्मकता दिसून आली. विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या विविध रंगांतील गणेशमूर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्पर्धेच्या ठिकाणी उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते.
ही स्पर्धा एकूण चार गटांमध्ये घेण्यात आली. पहिल्या गटात इयत्ता पहिली ते तिसरी, दुसर्या गटात इयत्ता चौथी ते सातवी, तर तिसर्या गटात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. चौथा गट सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थी, युवक आणि इतर स्पर्धकांनाही आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली.
सर्व गटांतील स्पर्धा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडल्या. प्रत्येक गटातील स्पर्धकांनी दिलेल्या वेळेत गणेशमूर्ती रंगवून पूर्ण केली. लहान मुलांपासून खुल्या गटातील स्पर्धकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. स्पर्धकांनी रंगविलेल्या प्रत्येक मूर्तीमध्ये वेगळी कल्पना आणि रंगसंगती पाहायला मिळाली.
‘केसरी’च्या विश्वस्त व्यवस्थापिका डॉ. गीताली टिळक यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या गणेशमूर्तींची पाहणी केली.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच गणेशोत्सवाचा आनंद सर्जनशील उपक्रमातून साजरा करता यावा हा या स्पर्धेचा हेतू होता. रंगांच्या माध्यमातून गणरायाची विविध रूपे साकारताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता.
Related
Articles
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
01 Sep 2026
चारित्र्याशिवाय पदवीला अर्थ नाही : राजनाथ
30 Aug 2026
पोलिस उपअधीक्षकाच्या नावाने मागितली २५ लाखांची लाच
30 Aug 2026
ना पाऊस, ना वारा, तरीही बत्ती गुल!
01 Sep 2026
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी अनीश सहस्रबुद्धे पंच
31 Aug 2026
कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?