मराठा समाजातील प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्रे द्या : जरांगे   

अन्यथा मुंबईवर मोर्चा नेण्याचा इशारा

जालना : मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत, या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण रविवारी सुरूच होते. गेल्या दोन दिवसांपासून ते उपोषण करत आहेत. मराठा समाजातील प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत अन्यथा मुंबईवर मोर्चा नेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  
 
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी शनिवापासून ११ दिवसांचे उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने समर्थक आले आहेत. मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी समजले जावे आणि तशी जात प्रमाणेपत्रे सरकारने द्यावीत. त्यामुळे शिक्षण आणि सरकारी नोकरीत प्रत्येक मराठा व्यक्तीला इतर मागसगर्वीय श्रेणीतून आरक्षणाचा लाभ मिळत राहील.अशी त्यांची अपेक्षा आहे. काल त्यांनी प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला कुणबी जाहीर करावे, अशी पुन्हा मागणी केली. मागणी अमान्य झाल्यास मुंबईवर मोर्चा नेण्यात येतील, असा इशारा दिला. १२ सप्टेंबर रोजी मुंबईत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यासाठी मराठा समाजाच्या केंद्रीय समितीची बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तो पर्यंत सरकारने मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले

Related Articles