ते काही संत नाहीत दीपकेंबद्दल वांगचूक यांची प्रतिक्रिया   

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टी संस्थापक अभिजीत दीपके यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. ती बाळगणे चुकीचे नाही.  ते काही संत नाहीत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी दिली. जंतर मंतर येथील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांचे भवितव्य काय असेल ? या प्रश्नावर वांगचूक बोलत होते.
 
दीपके, दास आणि रांका यांनी विद्यार्थी चळवळ राजकारणापासून आणि राजकीय महत्त्वाकांक्षेपासून  दूर ठेवावी, असा सल्लाही वांगचूक यांनी दिला.    दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान दीपके यांना राजकीय महत्त्वाकांक्षेची जाणीव झाली, असे सांगताना ती बाळगणे चुकीचे नाही आणि अधिकाधिक तरुण नेत्यांनी राजकीय पक्षात सामील व्हावे किंवा स्वतःचे पक्ष स्थापन करावेत, अशी त्यांची इच्छा आहे.

Related Articles