राज्यात भाजपला खडसेंनी उभे केले : पवार   

जळगाव : राज्यात भाजपला उभे करण्यात एकनाथ खडसे यांचे योगदान मोठे आहे, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी सांगितले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल मुक्ताईनगरमध्ये सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पवार बोलत होते. भाजपचा एकही वरिष्ठ नेता कार्यक्रमाला  उपस्थित नव्हता. त्यामुळे,अनेकांचा भुवया उंचावल्या.
 
पवार म्हणाले, मुक्ताईनगरची  सेवा करण्याचे काम खडसे यांनी केले. या मतदारसंघाने त्यांना विधानसभेत अनेकवेळा निवडून दिले. १९६७ मध्य  मी देखील राज्याच्या राजकारणात निवडून गेलो. विधानसभेच्या सभागृहात  पाटील आणि दुसरे खडसे यांची भाषणे कायम लक्षात राहिली. त्यांनी सभागृहात अतिशय प्रभावीपणे त्यांनी आपले मुद्दे मांडले, मंत्रिमंडळात १२ खाती सांभाळणारे खडसे एकमेव मंत्री होते, असे सांगून पवार यांनी खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीचें कौतुक केले. 

जयंत पाटलांकडून कौतुक

विधीमंडळातील प्रवेशापासून त्यांची राजकीय कारकिर्द मी जवळून पाहिली आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यानी खडसे यांचे कौतुक केले. त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. विधानसभेत कोणालाही थांबवता येत नसायचे, असा आवाज त्यांचा होता. त्यामुळे समोरच्याला बोलता येत नसे, विधानसभेत सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे हे त्यांच्यापासून शिकायला मिळाले.  सत्ता आल्यावर शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी आपली शक्ती पणाला लावली. अशक्य वाटणार्‍या पाण्याच्या योजना राबवून दाखवल्या, विकासाची कामे केली,त्याचे बीज त्यांनी रोवले, त्यांनी राज्यभर माणसे जोडली, असेही ते म्हणाले.

सत्ताप्राप्तीचे राजकारण नको : खडसे

राज्यातील राजकीय वातावरणाच्या घसरणीवर एकनाथ खडसे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. राजकारण सत्ताप्राप्तीपर्यत मर्यादीत राहता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त करताना समाजिक सहिष्णुता वाढली पाहिजे, असे मतही व्यक्त केले.  २०१४ पर्यंत राज्यातील राजकारण एक स्वच्छ आणि सौहार्दपूर्ण वातावरण होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र राहायचे, एकमेकांशी संवाद साधायचे आणि मिळून-मिसळून वागायचे. ते एकमेकांवर टीका करायचे, पण वैयक्तिक मतभेद कधीच इतक्या टोकाला जात नसत, असे खडसे म्हणाले. या प्रसंगी त्यांनी ७५ वर्षांतील कालखंडाचा आढावा घेतला.

गिरीश महाजन यांना टोला

अनेक दुःखद प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझा एकुलता एक मुलगा गेला. त्यावेळी कुटुंबाने साथ दिली, तुम्ही मला ताकद दिली त्यामुळे मी उभारी घेऊ शकलो. मुक्ताईनगरचे आधीचे नाव एदलाबाद होतं, ते नाव मी बदलले, काही कामे नशिबाने मिळतात. आज प्रत्येकाच्या तोंडात मुक्ताईनगर हे नाव आहे. आम्ही श्रीमंत आहोत हा भ्रम आहे. जामनगर मधील शेतकरी आज सुखी दिसतो तो केवळ आणि केवळ तापी नदी प्रकल्पांमुळे, असे सांगत त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता टोलाही लगावला.
 

Related Articles