E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?
Samruddhi Dhayagude
31 Aug 2026
भोटेकोशी नदीची पातळी वाढली; नागरिकांचा दक्षतेचा इशारा
काठमांडू : नेपाळमधील भोटेकोशी नदीच्या पाणी पातळीत रविवारी वाढ झाल्याचे दिसून आल्याने परिसरातील रहिवाशांना आणि मदतकार्य राबविणार्यांना सतर्कतचा इशारा देण्यात आला आहे.
हिमालयीन सीमावर्ती भागातून दक्षिणेकडे वाहणार्या भोटेकोशी नदीने पुराचे पाणी खालच्या प्रवाहाकडे वाहून नेले होते;या प्रवाहाने घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून नेले तसेच जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान केले होते. राष्ट्रीय आपत्ती धोका कमी आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने पातळीत होणारी वाढ चिंताजनक असल्याने सांगितले असू सतर्कतेचा इशारा काल दिला. याबाबत अधिकाधिक माहिती प्राप्त होताच दिली सातत्याने दिली जाणार आहे.
दरम्यान, अडीच हजार नागरिक बेपत्ता आहेत. त्यामध्ये परदेशी नागरिकांची संख्या ३२० आहे.. चीनच्या प्रदेशात ७ जणांचा मृत्यू झाला असून ५०० बेपत्ता आहेत. दरम्यान, नेपाळ सरकारने शोध आणि मदतकार्य वेगाने राबविले असून २० हजार सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. घटनास्थळी अडकलेल्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरच्या फेर्या सुरू आहेत. तसेच देशात अति दक्षतेचा इशारा देखील दिला आहे. नेपाळच्या हवामान खात्याने शनिवारी महापुराचा फटका बसलेल्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या शोध आणि मदतकार्याला देखील धोका पोहोचेल, अशी भीती व्यकत केली जात आहे.
भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले २७५ भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे १२८ जण बेपत्ता किंवा संपर्कात नाही आहेत. १०८ जणांची पुरातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
जलविद्युत प्रकल्पात शेकडो अडकले
पूरग्रस्त भागातील सुमारे डझनभर जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी शेकडो कामगार अडकल्याची शक्यता आहे. नेपाळी सुरक्षा दलांनी आतापर्यंत त्यापैकी १९१ जणांची सुटका केली आहे, तर अनेकजण अजूनही संपर्काबाहेर आहेत. अडकलेल्या कामगारांच्या बचावकार्यात भारताचे ११ सदस्यांचे एक पथक मदत करत आहे. नेपाळ लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिशुली जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी रात्रभर मुसळधार पाऊस पडत असूनही, नेपाळी सुरक्षा कर्मचार्यांनी भारतीय बोगदा तज्ज्ञांच्या मदतीने बोगद्याचे प्रवेशद्वार शोधून तिथे अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न शनिवारी मध्यरात्रीनंतरही सुरू ठेवले.
बाधित नागरिकांना रोख रकमेचे वाटप
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सरकारने रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील बाधित नागरिकांना रोख स्वरूपात १ कोटी (१० दशलक्ष) नेपाळी रुपये, धाडिंगसाठी ५० लाख (५ दशलक्ष) रुपये आणि विविध नगरपालिकांना ६ कोटी ७५ लाख (६७.५ दशलक्ष) रुपये वितरित केले आहेत.
अन्नधान्याचे ३७ ट्रक रवाना
आतापर्यंत बाधित भागांमध्ये अन्नधान्याचे ३७ ट्रक आणि अन्न व इतर आवश्यक साहित्याने भरलेली सात हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत. रसुवामधील उत्तरगया आणि धुंचे येथे दोन टन अन्नसामग्री पाठवण्यात आली.
भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने ६८.५ टन मदत साहित्य पुरवले असून, शोध आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी तांत्रिक पथके, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि आवश्यक उपकरणेही पाठवली आहेत.
बळींची संख्या ७८८ वर
काठमांडू : नेपाळमध्ये रविवारी काही मृतदेह सापडल्यामुळे महापुरातील बळींची संख्या ७८८ वर पोहोचली अडीच हजारजण बेपत्ता आहेत. नेपाळ- तिबेट सीमेवर हिमनदीचा मोठा भाग बुधवारी कोसळला होता. त्यानंतर पाण्याचे लोंढे, दगडधोंडे आणि माती खोर्यातून वाहून नेपाळच्या रहिवाशी भागांत पोहोचल्याने होत्याचे नव्हते झाले होते.
महापुरामुळे विविध जिल्ह्यांतील शहरे आणि गावे महापुराच्या लोंढ्यातून वाहून गेली. उत्तर आणि मध्य नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यांना मोठा फटका बसला आहे बाधित आठ जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी बेपत्तांचा शोध घेण्यासाठी मदतकार्य वेगाने सुरू असून काल आणखी मृतदेह सापडले आहेत.राष्ट्रीय आपत्ती धोका कमी आणि व्यवस्थापन प्राधिकराने सांगितले मृतांचा आकडा ७६८ वर गेला आहे. आतापर्यंत चितवान जिल्ह्यात २६४, पूर्व नवलपासरीतून १९४, पश्चिम नवलमारसीतून १००, गोरखातून ५८, धाडींगमधून ५०, नुवाकूटमधून ५२, तनाहूमधून ३७ आणि रासुआतून १३ मृतदेह सापडले. २ हजार ५०२ नागरिक अजूनही बेपत्ता असून त८ हजार ७४० जणांची महापुरातून सुटका केली.नेपाळच्या शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार १८ शिक्षक आणि २३८ विद्यार्थी तीन बाधित जिल्ह्यातून बेपत्ता आहेत.
Related
Articles
सतीशन यांच्या वाहनांचा ताफा अडविणार्या नेत्याला अटक
30 Aug 2026
जितेंद्र मिश्रा अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी
02 Sep 2026
कृषी अभ्यासक्रमाच्या तिसर्या यादीत 7 हजारांवर विद्यार्थ्यांना संधी
03 Sep 2026
कायदे सामान्यांसाठीच? (अग्रलेख)
01 Sep 2026
विदर्भ, मराठवाड्यापेक्षा अधिक शेती कर्जे मुंबईला!
30 Aug 2026
सरकार स्वतःच गैरव्यवहारामध्ये अडकले
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
श्रावण आला