E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
नेपाळकडे मदतीचा ओघ
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
तीन दिवसांत दोन अब्जांहून अधिक आपत्ती निवारण निधी जमा
काठमांडू : विनाशकारी जलप्रलयानंतर नेपाळच्या आपत्ती निवारण निधीत ३ दिवसांत २ अब्जांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.नेपाळ सरकारने पूरग्रस्त भागास ’आपत्तीग्रस्त क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे.पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार दुपारपासून ते गुरुवार मध्यरात्रीपर्यंतच्या ३६ तासांत १.९१ अब्ज जमा झाले. तर शुक्रवारी ३८.५५ कोटींची मदत प्राप्त झाली. त्यामुळे आपत्ती निवारण निधीची रक्कम २.१७ अब्जांवरून ४.०९ अब्जांवर पोहोचली. निधीच्या समन्वयासाठी सरकारने अर्थ मंत्रालयाची ’नोडल मंत्रालय’ (मुख्य समन्वय संस्था) म्हणून नियुक्ती केली आहे. ही रक्कम १० वेगवेगळ्या व्यावसायिक बँकांमधील खात्यांमध्ये जमा करण्यात आली असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले. संस्थात्मक देणगीदारांकडून एक कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम येत आहे. याखेरीज, वैयक्तिक देणगीदार स्वतः मंत्रालयात जाऊन रोख स्वरूपात योगदान देत असल्याचे अर्थमंत्री स्वर्णिम वाग्ले यांनी सांगितले. पंतप्रधान बालेन्द्र शाह आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यही आपला एक महिन्याचा पगार आपत्ती निवारण निधीला देणार आहेत, असेही ते म्हणाले.
Related
Articles
दहशतवादाचे धोरण राबविणार्या देशाविरोधात उभे ठाका : मोदी
02 Sep 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता बाबींचा आयुक्तांकडून आढावा
01 Sep 2026
ऊस वजनकाट्यांच्या तपासणीसाठी जिल्हानिहाय भरारी पथके
02 Sep 2026
मेस्सीच्या निवृत्तीने चाहते भावूक; आठवणींचा प्रवास पुन्हा चर्चेत
02 Sep 2026
भारताची विजयी सलामी
01 Sep 2026
भारताला महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?