युक्रेनची राजधानी किव्हवर रशियाचे जोरदार हवाई हल्ले   

२७ नागरिकांचा मृत्यू ; ५० घरांचे नुकसान 

किव्ह : युक्रेनची राजधानी किव्ह परिसरात रशियाच्या हवाई  दलाने जोरदार हल्ले चढवले. २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५० घरांचे नुकसान झाले. बुचा जिल्ह्यात हल्ल्यानंतर परिसरात आगीचे लोळ उसळले होते.
 
विभागीय लष्करी प्रशासनाचे प्रमुख तैमूर ताकाचिंको यांनी सांगितले, की, ५० रहिवाशी इमारतींचे नुकसान झाले. परिसरात आग लागल्यानंतर ती अन्य घरे आणि रेस्टॉरंटपर्यंत पसरत गेली. अध्यक्ष झेलेंन्स्की यांनी मायल्या गावातील एका गोदामही हल्ल्यात बेचिराख झाले. गोदाम कशाचे होते ? त्यात काय होते ? याचा तपशील त्यांंनी दिला नसला तरी या प्रकरणी संंशयित अधिकार्‍यांच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. घराजवळ किंवा नागरी वस्ती परिसरात 

दारुगोळा साठा करण्यास सहसा 

परवानगी दिली जात नाही. तसे नियमही आहेत, असे सांगताना ते म्हणाले, राजधानी किव्ह आणि परिसरात जोरदार हल्ले केले जात आहेत.  हा तिसरा मोठा हवाई हल्ला होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच शहरातील आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.  चार वर्षांपूर्वी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले होते. तेव्हापासून युद्ध सुरूच असून  वारंवार हल्ले चढवून युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे. 

Related Articles