E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेत उद्योगपतींची गोलमेज परिषद
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
भारतात बनवा आणि जगात विका
उद्योगपती आणि गुंतवणूकदारांना सीतारामन यांचे आवाहन
वॉशिंग्टन : जगभरातील कंपन्यांनी भारतात उत्पादन करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि नव्या जगाची उभारणी करावी, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. गुंतवणूकदारांनी देशात उत्पादन निर्मितीसाठी पाया रचावा, तंत्रज्ञान केंद्रे उभारण्यासाठी भारताने दिलेल्या संधीचे सोने करावे, असेही त्यांनी सांगितले.
शिकागोमध्ये उच्चस्तरीय उद्योगपतींची गोलमेज परिषद झाली. या परिषदेचे आयोजन अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंचाच्या सहकार्याने शिकागोमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाने केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरील आघाडीचे गुंतवणूकदार आणि उद्योगपती परिषदेत सहभागी झाले होते.
त्या म्हणाल्या केवळ एकाच क्षेत्रात गुंतवणूक करावी, अशी भूमिका नाही. विविध क्षेत्रे त्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये विकास, बुद्धिमत्ता, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि गेले दशकभर राबविलेले सातत्यपूर्ण उपक्रम आणि योजनांचा समावेश आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी मोठा वाव भारतात आहे. या संधीचे सोने करुन भारताला जागतिक उत्पादनांचे केंद्र बनवून त्याचा लाभ विविध देशांना मिळवून देता येणे शक्य आहे.
पर्यावणपूरक उद्योगांवर भर देण्यात आला आहे. तेथे गुंतवणूक करावी, अन्य क्षेत्रात उत्पादन, कल्पकता आणि त्याहून पुढेही बरेच काही करता येणे शक्य आहे. या वेळी त्यांनी जागतिक भागीदारांना सह विकास, सह उत्पादन आणि जागतिक बाजारपेठ तयार करण्यासाठी निमंत्रणही दिले. भारताकडे माल विकण्याची बाजारपेठ म्हणून पाहू नका, असा सल्ला देताना त्या म्हणाल्या, जागतिक पातळीवर उत्पादन निर्मितीचे आणि नियार्ंतीचे केंद्र म्हणून पाहायला हवे. उत्पादनांचा पाया घाला, तंत्रज्ञान आणि कल्पकतेची केंद्रे उभारण्यासाठी या, ग्राहक बाजारपेठ किंवा दीर्घकालीन पायाभूत गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून भारताकडे पाहा, भारतीय अभियांत्रिकी ज्ञान, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञानाचे वातावरण निर्माण करता येणे शक्य आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेसह अनेक क्षेत्रांतील संधीचे सोने करा
भारत आणि जगासाठी भारतात उत्पादन करा, यावर परिषदेत अधिक भर देण्यात आला होता. त्यामध्ये उत्पादन आहेच. त्याशिवय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल क्षेत्र, आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा, खाद्यपदार्थ प्रक्रिया, संरक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची मोठी संधी आहे. जागतिक कंपन्या पुरवठा साखळी आणि भांडवली वाटपाचे पुनर्मूल्यांकन करत असताना, भारत केवळ एक मोठी बाजारपेठच नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणूक आणि संचालन मंच म्हणूनही अधिक सखोल संधी देत आहे, असे सीतारामन म्हणाल्या. भारताच्या आधार, यूपीआय, डिजिलॉकर, ओएनडीसी आणि इंडिया स्टॅक यांसारख्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांनी मोठ्या लोकसंख्येसाठी व्यासपीठे तयार केली आहेत. भारताची जागतिक क्षमता केंद्रे अधिकाधिक जागतिक केंद्रे बनत असल्याने, एआय, अभियांत्रिकी, विश्लेषण, उत्पादन विकास, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रांमध्ये उच्च-मूल्याचे व्यवसाय उभारण्याची पुढील संधी आहे, असे त्या म्हणाल्या.
Related
Articles
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
08 Sep 2026
दिल्लीत वसतिगृहाची इमारत कोसळली
07 Sep 2026
दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा
08 Sep 2026
जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचे आरोप
07 Sep 2026
शीतल अंतिम फेरीत; सरिता कांस्यपदकाच्या लढतीत
08 Sep 2026
प्रक्रिया न्याय्य आहे का? (अग्रलेख)
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार