दहशतवाद मुक्त प्रदेश हाच द़ृष्टिकोन : मोदी   

शांघाय शिखर परिषदेला रवाना

नवी दिल्ली : उझबेकिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताक  देेशांच्या दौर्‍याासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रवाना झाले. किर्गिझमधील बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रदेश दहशतवाद मुक्त असावा, अशी भारताची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
मोदी प्रथम उझबेकिस्तानला २९ आणि ३० ऑगस्ट दरम्यान भेट देणार असून त्यानंतर ते ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर अखेर किर्गिझची राजधानी बिश्केकमध्ये आयोजित शांघाय सहकार्य शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. भारत आणि मध्य आशियातील देशांचे संबंध अधिक द़ृढ करणे हा दौर्‍याचा प्रमुख हेतु आहे. 
 
दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी प्रादेशिक शांतता, समृद्धी आणि स्थैर्य हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीयांची हृदये मूल्यांनी भरली असून ते जगासोबत वाटचाल करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे 

Related Articles