E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
धमकीच्या घोषणा दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करु
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
आयआयटी दिल्लीच्या संचालकांचा विद्यार्थ्यांना इशारा
नवी दिल्ली : आयआयटी दिल्लीच्या आवारात धमकीच्या घोषणा देणार्या आंदोलक विद्यार्थ्यांना संचालक रंगन बॅनर्जी यांनी शनिवारी फैलावर घेतले. धमकीच्या घोषणा द्याल तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आयआयटी दिल्लीतील ३१ वर्षांच्या एमएससीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आवारात निदर्शने केली होती. धमकीच्या घोषणा देत आवारातील शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला तर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा बॅनर्जी यांनी दिला आहे. ते म्हणाले, गुरुवारी रात्री निदर्शने तीव्र झाल्याचे दिसून आले. निदर्शक आवारातील रहिवासी भागाच्या परिसरात आले होते. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना ई मेल केले होते. त्यात म्हटले होते. प्राध्यापक वर्गाच्या निवासी भागात साडेदहा ते साडेबार दरम्यान निदर्शने झाली होती. एकूणच प्रकार सहन करण्यापलीकडे होता. धमक्यांची भाषा घोषणा देताना वापरली गेली होती. अशा प्रकारची वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही. प्राध्यापकांचे खासगी आयुष्य, मुलांसह कुटुंबीयांची सुरक्षा आणि शांततेला तडा जाता कामा नये. एकूणच प्रकार आवारातील वातावरण बिघडविण्याचा होता, असे ते म्हणाले.
Related
Articles
भारताची विजयी सलामी
01 Sep 2026
बिकानेरमधील अपघातात बालकासह तिघांचा मृत्यू
30 Aug 2026
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत भाविकांची रीघ
01 Sep 2026
मुलाला गमावलेल्या पित्याचा संताप; रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला जाब
31 Aug 2026
निवडणूक कामकाजाचा कर संकलन विभागाला फटका; मालमत्ता कराच्या सेवांना विलंब
02 Sep 2026
बिहारमध्ये दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा नापास शिक्का पुसला
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?