सतीशन यांच्या वाहनांचा ताफा अडविणार्‍या नेत्याला अटक   

तिरुवनंतपूरम : केरळममध्ये मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन यांच्या वाहनांचा ताफा अडविणार्‍या काँग्रेस नेत्याला पोलिसांनी अटक केली. सतीशन चेंथीमधील एका कार्यक्रमासाठी शनिवारी जात होते तेव्हा घटना घडली होती.
 
अनिल कुमार ऊर्फ चेंथी अनी, असे नेत्याचे नाव असून ते तिरुवनंपूरम  जिल्हा काँगसि समितीचे नेते आहेत.  अनिल आणि त्यांचा सहकारी यांनी  सतीशन यांच्या वाहनांचा ताफा अडविला होता. आमच्या कार्यक्रमाला प्रथम चला मग पुढे जा, अशी मागणी त्यांनी केली. सतीशन यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आणि नंतर ते पुढील प्रवासासाठी निघून गेले. दरम्यान, सतीशन हे चेम्पझंथीमध्ये समाजसुधारक श्री. नारायण गुरु यांच्या जन्म शताब्दीच्या पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी शुक्रवारी जात होते. मार्गावरच चेंथी गाव आहे. तेथेही असाच गुरुगौरव कार्यक्रम अनिल कुमार आणि सहकारी यांनी आयोजित केला होता. त्यासाठी त्यांनी वाहनांचा ताफा अडविला होता. 
 

Related Articles