E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
बिहारमध्ये दहावी, बारावी विद्यार्थ्यांचा नापास शिक्का पुसला
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
कौशल्य प्रशिक्षणास पात्र अशी नवी ओळख
पाटणा : बिहारमध्ये दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले नसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवरील नापास हा शिक्का कायमचा पुसला जाणार आहे. नापास अशा उल्लेखाऐवजी कौशल्याच्या प्रशिक्षणास पात्र अशी नवी ओळख विद्यार्थ्यांना देण्याचा निणर्र्य राज्य सरकारने घेतला आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांचा कल व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याकडे असतो. मात्र, नापास झाल्यामुळे ते अशा प्रशिक्षणाला मुकत आहेत, असे बिहार बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग अँड एक्झामिनेशन त्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने नापास हा शिक्का कायमचा पुसून त्याऐवजी त्यांना कौशल्य प्रशिक्षणास पात्र, अशी नवी ओळख विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.. शिक्षण विभागाने नव्या नियमाची तातडीने दखल घेतली असून तो लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत. जे विद्यार्थी कौशल्यास पात्र असे प्रमाणपत्र सादर करतील ते तसे शिक्षण घेण्यास पात्र ठरतील. असे शिक्षणमंत्री मिथिलेश तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, विद्यार्थी नापास झाले असले तरी त्यांची बुद्धिमत्ता नाहीशी होत नाही. केवळ गुण कमी मिळाले असल्याने ते उत्तीर्ण झालेले नसतात. दहावीत नापास झालेले आणि पुरवणी परीक्षा देणार्या विद्यार्थ्यासाठी एक महिन्याचे विशेष मार्गदर्शक सत्र आयोजित केले जाईल. त्याद्वारे परीक्षेत तो यशस्वी होईल, असे पाहिले जाईल. पर्यायाने विद्यार्थ्यांना मोठे पाठबळ मिळेल. पारंपरिक पुस्तकी ज्ञानापेक्षा कृतिशील जग निर्माण करुन दिले जाईल. त्यासाठी सरकार सर्व ती मदत करणार आहे.
शनिवारी दप्तराला सुट्टी
सर्व सरकारी शाळांमध्ये एक दिवस दप्तराशिवाय उपक्रम राबविण्यात आला आहे. सहा ऑगस्ट रोजी तशी घोषणा केली होती. उपक्रम दर शनिवारी राबविला जाणार आहे. शनिवारी शाळेची वेळ सकाळी साडेनऊ ते १ अशी राहणार असून उर्वरित दिवशी ती अर्थात सोमवार ते शुक्रवारी साडेनऊ ते चार अशी शाळा भरणार आहे.
Related
Articles
काळेवाडी राजवाडे नगर येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई
08 Sep 2026
लाइफ सायकल फंड
07 Sep 2026
पंढरपूर कॉरिडॉरमधील बाधितांच्या जागा मिळणार
02 Sep 2026
वाई औद्योगिक वसाहतीत भीषण आग
03 Sep 2026
उकडीच्या मोदकांना यंदा दुप्पट मागणी!
06 Sep 2026
नीट-पीजीच्या फेरपरीक्षेचा जनहित अर्ज फेटाळला
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार