जात पडताळणी समित्या बरखास्त करा   

जरांगे यांची मागणी; उपोषणास सुरूवात

जालना : राज्यातील जात पडताळणी समित्या रद्द कराव्यात, अशी माणगी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारी केली. तसेच, आमरण उपोषणास आंतरवाली सराटीमध्ये सुरूवात केली. जात पडताळण्या समित्या अन्य राज्यांत नाहीत, अशी माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच दिली होती. या समित्यांची महाराष्ट्रात गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत जरांगे यांनी प्रमाणपत्राबाबतच्या मागण्या अंतरवाली सराटीमध्ये मान्य झाल्या नाही तर मुंबईकडे आंदोलन कूच करेल, असा इशारा राज्य सरकारला दिला. आमचे प्रश्न सोडवले नाही; तर आम्ही ’वर्षा’ बंगल्यावर जाऊ. सरकारी शिष्टमंडळ चर्चेसाठी आले, तर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. पण, हे माझे अंतिम आंदोलन आहे. जोपर्यंत सर्व प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, असेही ते म्हणाले. 

Related Articles